Pola 2023 esakal
आरोग्य

Pola 2023 : पोळ्याला मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या बहुगुणी पळसाच्या फुला-पानांचे आरोग्यदायी लाभ महितीये?

बहुगुणी पळस वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे

सकाळ ऑनलाईन टीम

पोळ्यासाठी होते मोठ्या प्रमाणात वृक्षतोड

Pola 2023 : पिठोरी अमावस्या अर्थात पोळ्याच्या दिवशी पळसाच्या झाडाच्या फांद्या (मेढे) दारात ठेवण्याची प्रथा आहे. आयुर्वेदानुसार बहुगुणी पळसात औषधी गुणधर्म सांगितले आहेत. मात्र, पोळ्यासाठी मोठ्या प्रमाणात पळस वृक्षांची कत्तल केली जाते. ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. बहुगुणी पळस वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे

विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी पळस वृक्षाच्या फांद्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. या फांद्या जाळल्याने घरातील किटक नाहीसे होत असल्याचे सांगितले जाते. आयुर्वेदात पळसाची फुलं आणि साल वापरण्याचे फायदे सांगितले आहेत. पळसामध्ये अँटीबॅक्टेरियल पदार्थ, अँटिफंगल आणि अँटीॲलर्जिक गुणधर्म असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. राहुल राऊत म्हणाले.(Lifestyle)

बहुगुणी पळस

कफ-पित्त दोषात फायदेशीर असलेल्या पळसाच्या पानांमुळे पचन सुधारते. लठ्ठपणा आणि मधुमेहावर पळस फायदेशीर आहे. पळसाच्या बिया बारीक करून कोमट पाण्यासोबत सेवन केल्यास पोटातील जंत मारतात. (Bail Pola)

जुलाब, उलट्या, गॅस आणि पोटदुखीवरही पळसबिया फायदेशीर आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे रक्त योग्यप्रकारे डिटॉक्स होत नाही. रक्तात दोष होतो. त्यावेळी खरूज, त्वचा काळवंडते अशावेळी पळसाची साल उकळून त्याचा रस पिणे फायदेशीर आहे. पळसाच्या फुलाचा रस वात दोष काढतो. पळसाची फुले रात्री पाण्यात ठेवून, सकाळी गाळून त्यात मीठ अथवा खडीसाखर मिसळून सेवन केल्यास दम्यावर प्रभावी ठरतात.

- डॉ. राहुल राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT