Protein Deficiency  esakal
आरोग्य

Protein Deficiency : महिलांमध्ये प्रोटीनची कमतरता झाल्यास दिसतात ही लक्षणं, दुर्लक्ष केल्यास..

प्रोटीनची कमतरता झाल्यास महिलांमध्ये कोणती लक्षणं दिसून येतात ते जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Protein Deficiency : शरीराला प्रत्येक घटक योग्य प्रमाणात असल्यास आपले शरीर निरोगी राहते. प्रोटीन हा शरीरातील एक महत्वाचा घटक आहे. प्रोटीनची शरीरात कमतरता झाल्यास अनेक समस्या उद्भवतात. तर प्रोटीन जास्त प्रमाणात झाल्यास वजन वाढते. तेव्हा आहारात प्रोटीनचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. प्रोटीनची कमतरता झाल्यास महिलांमध्ये कोणती लक्षणं दिसून येतात ते जाणून घेऊया.

महिलांमध्ये सरासरी दररोज किमान 50 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात. एक ग्राम प्रोटीन ४ कॅलरीज निर्माण करतात. तेव्हा यानुसार तुमच्या खाण्याच्या सवयी बदला.

प्रोटीनचे कार्य

महिलांसाठी प्रोटीनचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

  • प्रोटीन स्नायू तयार करण्याचे काम करतात

  • शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि रक्त प्रवाह राखण्याची काळजी घेतात

  • हार्मोन्सच्या पातळीकडे लक्ष देतात

  • पचनास मदत होते

  • व्यायाम किंवा दुखापत झाल्यानंतर स्नायूंची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करण्यात मदत करतात

  • पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

  • रोगप्रतिकारक शक्ती संतुलित ठेवते

  • यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून प्रतिबंधित करते

  • कोलेस्ट्रॉल कमी करते

  • नखे, केस, हाडे आणि त्वचा तयार होण्यास मदत होते

ही लक्षणे शरीरात प्रोटीनची कमतरता असल्याचे दर्शवतात

पटकन थकवा

लवकर भूक लागते

खूप मूडी असणे

हात आणि पायांना सूज आहे

वारंवार आजारी पडणे

केस आणि नखे कमकुवत होणे

कोरडी त्वचा

प्रोटीन मिळवण्यासाठी हे पदार्थ खावे

अंडी आणि चिकन

हिरवे वाटाणे

दूध, चीज, दही

बदाम

टोफू

मसूर, राजमा

ब्रोकोली

ओट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम अन् भारताचा मालिका विजय! जसप्रीत, नितीशचे खतरनाक यॉर्कर Video

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

SCROLL FOR NEXT