Protein Powder Side Effects esakal
आरोग्य

Protein Powder: प्रोटीन पावडरचे धोके वाचलेत तर स्वप्नातही विकत घेणार नाहीत...

आपल्या शरीराच्या स्नायूंसाठी प्रोटीन्स खूप महत्वाचे आहेत. हे मॅक्रोन्यूट्रिएंट अनेक अमीनो ऍसिडपासून बनलेले आहे

Lina Joshi

Protein Powder Side Effects: आपण अनेकदा जीमला जाणाऱ्या लोकांच्या तोंडी एक शब्द ऐकतो अन् तो म्हणजे प्रोटीन पावडर. ते दररोजच्या जीवनात स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी खूप पथ्य पाळतात.

त्यांचं एक प्रॉपर रूटीन आणि डाएट असतं. सध्या काळाची गरज सगळ्यांनीच फिट राहण्याची आहे आणि लॉकडाऊन पासून तर सगळ्यांनीच आपल्या तब्बेती बाबत कानाला खडा लावला आहे.

आपल्या शरीराच्या स्नायूंसाठी प्रोटीन्स खूप महत्वाचे आहेत. हे मॅक्रोन्यूट्रिएंट अनेक अमीनो ऍसिडपासून बनलेले आहे, जे स्नायूंच्या विकासास मदत करतात. म्हणूनच सर्व आरोग्य तज्ञ दररोज आपल्या आहारात प्रोटीन्सयुक्त पदार्थ समाविष्ट करण्याची शिफारस करतात.

बॉडी बिल्डिंग किंवा जीमला जाणाऱ्या लोकांना जास्त प्रोटीनची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी ते प्रोटीन पावडरचे अवलंबन करतात. या पावडर मुळे आपली फिटनेस उद्दिष्टे साध्य करायला मदत होते आणि आवश्यक हे रिझल्ट समोर येतात.

पण ते तुमच्या पोटासाठी वाईट असू शकते का? आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत होकारार्थी उत्तर दिले आहे.

प्रोटीन पावडरचे दुष्परिणाम

1. गॅस, पोट फुगी आणि क्रॅम्प

ही पावडर तयार करण्यासाठी डेअरी किंवा वनस्पती आधारित प्रोटीन वापरली जातात. काही लोकांच्या पचनसंस्थेला ते पचवण्यात खूप अडचणी येतात. ज्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि पोटात क्रॅम्पची समस्या होऊ शकते.

2. किडनीचा आजार

प्रोटीन पावडारच्या अतिसेवनाने किडनीचे नुकसान होऊ शकते शिवाय कॅन्सरचा सुद्धा धोका होऊ शकतो.

3. आतड्यांतील जीवाणूंमध्ये असंतुलन

अनेक प्रोटीन पावडरमध्ये कृत्रिम गोडवा, स्वाद आणि रंग असतात, जे आतड्याच्या आरोग्यास हानी पोहोचवतात. या गोष्टी पोटात असलेल्या निरोगी आतड्यांतील बॅक्टेरियाचे असंतुलन करू शकतात आणि पचन बिघडू शकतात.

4. रक्तातील शुगरचे प्रमाण वाढू शकते

प्रोटीन पावडर चवदार बनवण्यासाठी भरपूर साखर वापरली जाते. याच्या सेवनाने इन्सुलिन वेगाने वाढते आणि वजन वाढते. यामुळे डायबिटीसचा धोका वाढू शकतो.

5. त्यात 'विषारी' पदार्थ असू शकतात

'क्लीन लेव्हल प्रोजेक्ट'च्या नुकत्याच झालेल्या संशोधनाचा दाखला देत डॉ. वरलक्ष्मी म्हणाल्या की, काही प्रोटीन पावडरमध्ये शिसे, आर्सेनिक आणि कीटकनाशकांसारखी विषारी उत्पादने असू शकतात, ज्यामुळे तुमच्या पोटाला हानी पोहोचू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT