थोडक्यात:
५५ व्या वर्षीही माधवन तरुण दिसण्याचं श्रेय आयुर्वेदिक सवयींना आणि नैसर्गिक जीवनशैलीला देतो.
तो केसांसाठी तिळाचं आणि नारळाचं तेल वापरतो व त्वचेसाठी सकाळचं ऊन आणि घरचं अन्न महत्त्वाचं मानतो.
फिल्टर्स आणि कॉस्मेटिक उपचारांवर अवलंबून राहणाऱ्या चित्रसृष्टीवर तो टीका करतो आणि नैसर्गिक वृद्धत्व स्वीकारतो.
R Madhavan natural anti‑ageing tips: नेहमी आपल्या उत्कृष्ट अभिनय, संयमी वृत्ती आणि गुड लूक्समुळे चर्चेत असणारा आर माधवनने नुकताच त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा केला. या वयातही एवढा डॅशिंग आणि गुड लुकींग दिसण्यामागे एक खास सिक्रेट आहे असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. आर माधवनने पन्नाशीतही कोणतीही ब्युटी ट्रिटमेंट न घेता तरूण दिसण्यासाठी साध्या दैनंदिन सवयी आणि आयुर्वेदाची मदत घेतल्याचं सांगितलं आहे.
नैसर्गिक उपायांवर विश्वास
गोरं दिसण्यासाठी आणि निस्तेज त्वचा हवी म्हणून बरेच कलाकार कॉस्मेटिक सर्जरी करतात. वेगवेगळ्या पद्धतीचे स्किन टाईटनिंग इंजेक्शन्स घेतात. पण माधवनने यासाठी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचाराला प्राधान्य दिल्याचं सांगितल आहे. इंटरनॅशनल मेन्स मॅगझीन GQशी बोलताना तो म्हणाला, " मी सकाळी गोल्फ खेळतो, उन्हात फिरतो. त्यामुळे त्वचेला घट्टपणा येतो आणि सुरकुत्याही टळतात. मला उन्हात राहणं चांगलं वाटतं." नारळाचं तेल आणि नारळपाणी, घरचं ताजं शिजवलेलं अन्न आणि आयुर्वेदावर आधारित आरोग्यदायी सवयी, हेच त्याच सुंदर आणि तरुण दिसण्याचं खरं रहस्य आहे.
बनावटपणाला विरोध
"आजकाल बऱ्याच कलाकारांना प्लास्टिक सर्जरी, फिल्टर्स किंवा इतर सौंदर्य उपचारांचा आधार घ्यायचा मोह होतो. ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण मी तसं काहीच करत नाही. लोक माझ्याबद्दल खूप काही बोलतात, पण कमीत कमी माझा चेहरा तरी जसा आहे तसाच राहावा- खरा आणि पारदर्शक, असं मला आतून वाटतं," असं माधवन मनापासून सांगतो.
आईच्या हातचं, घरंच जेवण
आर माधवन खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी स्पष्ट आहे. त्याला फॅन्सी डाएट किंवा जंक फूड आवडत नाही. त्याऐवजी त्याला घरी बनवलेलं आणि रुचकर जेवण आवडतं. शूटिंगच्यावेळी देखील त्याच्यासोबत त्याचा खास शेफ असतो, ज्यामुळे त्याला आई करायची तास वरण-भात, भाजी पोळी सारखा साधं जेवण जेवता येतं.
त्याचबरोबर भाताविषयीच्या अफवांवर देखील त्याचं ठाम मत मांडताना तो म्हणाला की, त्याचे आजीआजोबा दिवसातून तीन वेळा भात खायचे आणि तरी ते ९० वर्षापेक्षा जास्त जगले. त्यामुळे भात काही दोषी नाही. आपण काय खातो, किती साधेपणाने जगतो, हे महत्त्वाचं आहे.
आयुर्वेदाची मदत
आर माधवनचे केस नेहमीच चर्चेचा विषय बनले आहेत. वाढत्या वयानुसार पांढरे झालेले केस तो कधीच लपवत नाही. याउलट तो त्याचे केस अभिमानाने मिरवतो.
केसांविषयी बोलताना तो म्हणाला, लहापानापासून दर रविवारी तो तिळाच्या तेलाने पूर्ण अंगाला आणि डोक्याला मसाज करतो, ज्याला दाक्षिणात्य भागात ‘नल्ला एननई’ म्हणतात. याशिवाय उरलेल्या दिवसात तो नारळाचं तेल ठराविक पद्धतीने लावतो. या सवयीमुळे गेल्या वीस वर्षात त्याला खूप फायदा झाल्याचे ही त्याने सांगितले आहे.
आर. माधवन त्याच्या तरुण दिसण्याचं श्रेय कशाला देतो?
(What does R. Madhavan credit for his youthful appearance?)
→ तो आयुर्वेद, नारळाचं तेल, सकाळचं ऊन आणि घरचं अन्न याला श्रेय देतो.
त्याने कधीही कॉस्मेटिक सर्जरी किंवा फिलर्स घेतले आहेत का?
(Has he ever undergone cosmetic surgery or used fillers?)
→ नाही, त्याने स्पष्ट सांगितलं आहे की त्याने कधीच कोणतेही भराव किंवा सौंदर्य उपचार घेतले नाहीत.
माधवनची केसांसाठी खास दिनचर्या काय आहे?
(What is Madhavan’s haircare routine?)
→ दर रविवारी तिळाच्या तेलाने अंग मालीश आणि उरलेल्या दिवशी नारळाचं तेल लावणं.
माधवन आहारामध्ये काय प्राधान्य देतो?
(What kind of diet does Madhavan follow?)
→ तो फॅन्सी डाएट टाळून घरचं साधं आणि ताजं जेवण प्राधान्याने खातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.