Rajma Chawal
Rajma Chawal  esakal
आरोग्य

Rajma Chawal : ही टेस्टी डिश खाऊन फक्त वजनच नाही तर शुगरही करा कंट्रोल, वाचा फायदे

साक्षी राऊत

Rajma Chawal : राजमा चावल हा एक पारंपारिक उत्तर भारतीय खाद्य पदार्थ आहे, जो भारतीयांना मोठ्या उत्साहाने खायला आवडतो. लाल राजमा आणि तांदळाचा वापर करून ही डिश बनवली जाते. राजमा आणि भाताचं हे मिश्रण कुणालाही वेड लावू शकतं. शतकानुशतके भारतातील लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या यादीत या डिशचा समावेश आहे. या पदार्थाची फक्त चवच भारी नाही तर त्याचे आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. मात्र अनेकांचा असा गैरसमज आहे की हा पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं, हे खरं आहे काय? राजमा भात खाल्ल्याने वजन वाढते का? चला जाणून घेऊया उत्तर.

'राजमा चावल' हा पोषक तत्वांचा खजिना आहे

राजम्यामधे प्रोटीन, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी 1 भरपूर प्रमाणात असते. यामुळेच स्पोर्ट्समन याचे जास्तीत जास्त सेवन करतात. राजमा आणि तांदळात वेगवेगळी अमीनो अॅसिड्स असतात. शाकाहारी लोकांसाठी, हे अन्न पोषक मिळवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

या प्रोटीनयुक्त अन्नामध्ये रक्तातील साखरेची पातळी राखण्याची क्षमता आहे. तसेच गॅस, पोट फुगणे आणि आतड्याच्या सुरळीतपणासाठी प्रोत्साहन देण्याची क्षमता आहे,राजमा हा अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे, विशेषत: त्यात मॉलिब्डेनम, लोह, फोलेट आणि तांबे इत्यादी भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमच्या सर्व व्हिटॅमिन कॅप्सूल निकामी होऊ शकतात. यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी याचे सेवन करावे.

हाय फायबर

राजमा चावल हा फायबरचा चांगला स्रोत मानला जातो. हेच कारण आहे की ते खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि फास्ट फूडची तल्लफही टाळता येते. अनेक अभ्यासांमध्ये हाय फायबर आहार वजन कमी करण्यास मदतनीस असल्याचे सांगण्यात आले आहे.

लो ग्लायसेमिक इंडेक्स

ग्लायसेमिक इंडेक्स (GI) हे अन्न रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवू शकते याचे मोजमाप ठेवते. उच्च GI असलेले अन्नपदार्थ रक्तातील साखर वाढवण्याचे काम करतात, ज्यामुळे भूक आणि क्रेवींग वाढू शकते. राजमा चावलमध्ये कमी GI आहे, याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढणार नाही.

प्रोटीनचा उत्तम सोर्स

राजमा प्रोटिनने समृद्ध आहे, ज्यात वजन कमी करण्यासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. राजमा चावल खाल्ल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. प्रथिने युक्त आहार घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. राजमा चावलमधे प्रोटीन भरपूर असल्याने त्याचे सेवन केल्यास वजन कमी करता येते. तसेच जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणूनच हे नेहमी मर्यादित प्रमाणात सेवन करा. पांढऱ्या भाताऐवजी तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता. याचे अनेक फायदे तुम्हाला पाहायला मिळतील.

डिस्क्लेमर - वरील उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

वाढदिवस साजरा करुन परतताना काळाचा घाला! तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 5 जण ठार

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची बाजी

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? कशी असेल बाजाराची स्थिती?

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT