Health Alert esakal
आरोग्य

Health Alert: वेळेआधीच मृत्यूचा धोका याच पदार्थांनी वाढतो! यांचा अतिवापर घातक...

रेडी टू ईट फूड तुमच्यासाठी किती धोक्याचं ठरू शकतं याची कल्पना तुम्हाला आहे काय?

सकाळ ऑनलाईन टीम

Health Alert: अलीकडे धावपळीच्या दैनंदिन जीवनात ऑफिसची घाई, वर्कलोड या सगळ्या गोष्टींमुळे अनेकजण 'रेडी टू ईट फूड'चा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. अशा प्रकारचे अन्न मार्केटमध्ये पॅकेज्ड असते. घरी आणल्यावर फक्त तुम्हाला ते गरम करायचे असते. मात्र रेडी टू ईट फूड तुमच्यासाठी किती धोक्याचं ठरू शकतं याची कल्पना तुम्हाला आहे काय? असे अन्न अनेक आजारांना आमंत्रण देत जीवाचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरतं.

ब्राझीलमध्ये झालेल्या एका अभ्यासात असे निदर्शनास आले की, रेडी टू ईट फूड खाल्ल्याने वेळेआधीच मृत्यूचा धोका 10 टक्क्यांनी वाढतो. ब्राझीलमध्ये 2019 मध्ये केलेल्या एक अभ्यासात असेही सांगण्यात आले की जो व्यक्ती रेडी टू ईट फूड खातो त्याचा मृत्यूचा धोका वाढतो.

धक्कादायक परिणाम पुढे आलेत

स्टडीमध्ये 30-69 या वयोगटातील पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये सत्तावन्न हजार लोकांच्या मृत्यूचं कारण हे रेडी टू ईट फास्ट फूड खाणे हे होते.

काय असते रेडी टू ईट फूड?

अनेकांजवळ वेळ नसतो तेव्हा ते रेडी टू ईट फूड बाजारातून विकत आणतात. असे पदार्थ कितीही हेल्दी असण्याचा दावा केला गेला तरी ते आरोग्यासाठी धोकादायक असतात. यामध्ये प्रिझर्वेटीव्ह कार्ब्स, शुगर आणि सॉल्ट भरपूर प्रमाणात असते. तसेच यात अत्याधिक प्रमाणात फ्लेवर्स असतात. ज्यामुळे तुमची इम्युनिटी घटते. दीर्घकाळ तुम्ही हे पदार्थ आहारात घेतल्यास लठ्ठपणा, बॅड कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड काय असतं?

जवळपास सगळ्यात प्रकारचे रेडी टू ईट पदार्थ हे अल्ट्रा प्रोसेस्ड असतात. यात स्टार्च, शुगर आणि अनहेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. यात कॅलरीजही भरपूर असतात. फ्रोजन फूड जसे की पिझ्झा, आलू टिक्की, कटलेट, चिप्स, पॅक्ड सूप, ब्रेकफास्ट सीरियल्स, कुकीज हे सगळे पदार्थ अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या कॅटेगिरीत बसतात.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स बाबत काय म्हणतात डॉक्टर?

डॉक्टरांच्या मते, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हा आहाराचा योग्य पर्याय नसू शकतो. यात आरोग्यवर्धक तत्व अजिबात नसतात. हे प्रोडक्ट वर्षोवर्ष साठवून ठेवण्यासाठी बनवले जातात. तेव्हा याचा अतिवापर करणे धोकायदायक ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT