Swasthyam Esakal
आरोग्य

Sakal Swasthyam : निरोगी जीवनशैलीसाठी पुण्यात ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’चे आयोजन

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’मध्ये ध्यानधारणा, योग-प्राणायाम, मानसिक आरोग्य, व्यायाम आदी विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ नागरिकांशी साधणार संवाद.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित उपक्रम १ ते ३ डिसेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये होणार आहे. ध्यानधारणा, योग-प्राणायाम, मानसिक आरोग्य, व्यायाम आदी विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

या उपक्रमाचे उद्‍घाटन योग व आध्यात्मिक गुरू श्री एम यांच्या हस्ते होणार असून, वैदिक व संस्कृत नामजपाने आरोग्याच्या स्वास्थ्यपूर्ण महाजागरास आणि आध्यात्मिक प्रवासास सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी संतुलन आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील तांबे सादर करणार असलेल्या नामजपाने उपक्रमाची सुरुवात होईल. ‘समग्र सृष्टीचे कल्याण आणि माइंडफुल लिव्हिंग’ या विचारधारेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ या पुस्तकाचे प्रकाशन या उपक्रमात होईल.

Yasmin Karachiwala

उपक्रमातील मार्गदर्शक

  • योगी व आध्यात्मिक गुरू श्री एम

  • पतंजली आयुर्वेदाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण

  • प्रसिद्ध पौराणिक लेखक अक्षत गुप्ता

  • केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या इंडियन नॉलेज सिस्टीम विभागाच्या आउटरीच प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर डॉ. अनुराधा चौधरी

  • प्रसिद्ध सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर यास्‍मीन कराचीवाला

  • फाउंडेशन फॉर हेड अँड नेक ऑन्कोलॉजीच्या अध्यक्षा व प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. ज्योती दाभोळकर

नागरिकांशी संवाद होणार

मंत्र जपाचा परिणाम केवळ मनावर होत नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य अशा दोन्हींवर होतो. मंत्राचा जप केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत वैदिक मंत्राचे महत्त्व आणि त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘ग्रेट ब्रिटन’ (यूके) येथून गैय्या संस्कृत येणार असून, त्यांना निखिल घोरपडकर पखवाजवादक व सौरभ गोडबोले साथ देणार आहेत.

‘सखी चारचौघी’च्या संचालिका श्रीगौरी सावंत, प्रसिद्ध परफ्युमर व सुगंधी तज्ज्ञ राजीव शेठ, पुण्यातील निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका अमृता चांदोरकर आणि गिर्यारोहक प्रियांका मोहिते, आशिष माने व उमेश झिरपे आदी प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत तज्ज्ञ उपक्रमात सहभागी होणार असून, त्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’, तर पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’, फायनान्शियल हेल्थ पार्टनर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टिस्टेट)’, सहयोगी प्रायोजक ‘चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.’ आहेत. तसेच ऊर्जा पार्टनर म्हणून ‘निरामय वेलनेस सेंटर’, हेल्थ पार्टनर ‘शारंगधर नॅचरल हेल्थ केअर’ आणि ईव्ही पार्टनर एथर आहेत.

‘स्वास्थ्यम्’ कशासाठी?

  • संस्कृत व वैदिक मंत्रांचा जप आणि आरोग्य

  • ध्यानधारणेविषयी शास्त्रीय माहिती

  • निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम

  • अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध

  • गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध

गायन, संगीतमय मेजवानी अन्‌ मनोरंजन

या उपक्रमाच्या माध्यमातून सूफी संगीतातील प्रसिद्ध गायक मुख्तियार अली व प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार आणि गायक रब्बी शेरगिल यांच्या गायनाच्या व संगीताच्या कार्यक्रमांचा आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमचेही सादरीकरण होणार आहे.

हे लक्षात ठेवा

कधी व कुठे

१ ते ३ डिसेंबर- २०२३, पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर, पुणे

आपला स्टॉल आजच बुक करा

१ ते ३ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या व्यावसायिकांना व संस्थांना आपल्या वस्तू व सेवांच्या प्रदर्शनासाठी दहा बाय दहा फूट जागा, दोन टेबल्स, खुर्च्या आणि लाइट व प्लग पॉइंटची सुविधा पुरविण्यात येईल. प्रदर्शनासाठी स्टॉलची बारा हजार व प्रीमियम स्टॉलची पंधरा हजार किंमत आहे. स्टॉल बुकिंगसाठी ८७६६४२४९९२ / ७७२२००१०९७ या मोबाईल क्रमांकावर व raibhan.shinde@esakal.com या मेल आयडीवर संपर्क साधावा.

खालील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भेट द्या

Instagram: instagram.com/globalswasthyam

Facebook: facebook.com/globalswasthyam

Twitter: twitter.com/GlobalSwasthyam

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी globalswasthyam.com या वेबसाइटला भेट देऊ शकता. उपक्रमात प्रवेश विनामूल्य असून, उपक्रमात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. रजिस्ट्रेशनसाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT