Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 14 December 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Nashik Live : सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटून कार उलटली, दोघांचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात समृद्धी महामार्गावर मंगळवारी भीषण अपघात घडला. टायर फुटल्यामुळे किया करेन्स ही कार भरधाव वेगात नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली आणि मागून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली. या दुर्घटनेत एका पुरुषासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन प्रौढ आणि आठ लहान मुले असे एकूण ११ जण या गाडीतून प्रवास करत होते. कल्याण येथील नातेवाईक सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे विवाह सोहळ्यासाठी आले असताना त्यांच्यावर ही दुर्दैवी वेळ ओढवली. अपघातात कार पूर्णतः चक्काचूर झाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com