What is Arteriovenous Malformation |Salman Khan  sakal
आरोग्य

Salman Khan Brain Disease: 59 व्या वर्षीही फिट दिसणाऱ्या सलमानला आहे मेंदूचा 'हा' गंभीर आजार; लक्षणे, धोका आणि उपचार जाणून घ्या एका क्लिकवर

Salman Khan Diagnosed with Rare Brain Disorder at 59 – Symptoms, Risks & Treatment Explained: 59 व्या वर्षीही अ‍ॅक्शन हिरो असलेल्या सलमान खानला मेंदूचा गंभीर आजार असल्याचा खुलासा, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय.

Anushka Tapshalkar

Symptoms of Arteriovenous Malformation in Salman Khan: बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत असतो. यावेळीही तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मात्र यावेळी कारण काही सिनेमाचा टीझर किंवा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड नाही, तर त्याच्या आरोग्याशी संबंधित एक मोठा खुलासा आहे. नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आला असताना सलमानने आपल्या काही गंभीर आजारांबद्दल उघडपणे सांगितले, ज्यामुळे चाहतेही हादरले आहेत.

59 वर्षांचा सलमान खान सध्या तीन मोठ्या आणि धोकादायक आजारांचा सामना करत आहे असे त्याने या कार्यक्रमात सांगितले. यात ब्रेन एन्यूरिज्म, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, आणि आर्टेरियोवीनस मॉलफॉर्मेशन (AVM) या विकारांचा समावेश आहे.

या त्रासांनंतरही त्याने अ‍ॅक्शन फिल्म्समध्ये फुल जोशात काम केले. त्यातील आर्टेरियोवीनस मॉलफॉर्मेशन (AVM) हा मेंदूतील रक्तवाहिन्यांचा गुंता असलेला दुर्मिळ आणि धोकादायक आजार आहे. तो नेमका कसा होतो, त्याची लक्षणं आणि उपचार काय असतात ते जाणून घेऊया.

आर्टिरिओव्हिनस मालफॉर्मेशन (AVM) म्हणजे काय?

आर्टियोवीनस मालफॉर्मेशन (AVM) ही अशी वैद्यकीय स्थिती आहे ज्यात मेंदूमधील रक्तवाहिन्या एकमेकांत अयोग्यरित्या जोडल्या जातात. यात मेंदूपर्यंत रक्त नेणाऱ्या धमन्या (आर्टरी) आणि मेंदूपासून रक्त बाहेर नेणाऱ्या शिरा (नसा) एकमेकांमध्ये गुंततात, ज्यामुळे उच्च दाबाने रक्त थेट धमन्यांमधून शिरांमध्ये जातं आणि त्यामुळे रक्तवाहिन्या फुटून ब्लीडिंग होण्याचा धोका निर्माण होतो.

आर्टिरिओव्हिनस मालफॉर्मेशनची (AVM) लक्षणे

  • सतत डोकेदुखी किंवा अचानक तीव्र डोकेदुखी

  • फिट्स येणे

  • चक्कर येणे किंवा अस्थिर वाटणे

  • अंग सुन्न पडणे किंवा झिणझिण्या येणे

  • बोलण्यात, स्मरणशक्तीत किंवा दृष्टीमध्ये अडचण

  • उलटी होणे

  • हातापायात अशक्तपणा किंवा अर्धांगवायू (Paralysis)

AVM मुळे काय धोके संभवतात?

  • मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता

  • अति रक्तस्रावामुळे कोमा किंवा मृत्यूची शक्यता

  • डोळ्यांच्या आसपास AVM असल्यास दृष्टी जाण्याचा धोका

  • हातपायांमध्ये असल्यास अर्धांगवायू (Paralysis)

  • AVM मध्ये एन्‍युरिझम म्हणजेच रक्तवाहिनीत फुगवटाही होऊ शकतो, जो फुटल्यास मोठा धोका निर्माण होतो

उपचार कसे केले जातात?

प्राथमिक उपचारात प्रामुख्याने फिट्स रोखणारी, रक्तदाब नियंत्रणासाठी आणि वेदनाशामक औषधे दिली जातात.

परंतु गंभीर परिस्थित एंजिओग्राफी करून AVMचे स्थान शोधले जाते. काहीवेळा 'ग्लू' किंवा 'कॉइल' टाकून रक्तवाहिन्या बंद केल्या जातात. एंडोस्कोपिक डिकंप्रेशनमध्ये कानामागून छेद घेऊन धमन्या-शिरा वेगळ्या केल्या जातात. गामा नाइफ रेडियोसर्जरीत किरणोपचारांनी AVM हळूहळू कमी केला जातो.

हे लक्षात ठेवा

  • रक्तदाब नियंत्रणात ठेवा

  • मानसिक ताण कमी ठेवा

  • डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या

  • कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT