Eye Care google
आरोग्य

Eye Care : तुम्हालाही आहे का सतत डोळे चोळण्याची सवय ? मग असा आहे धोका

डोळ्यांना जोरात चोळल्याने त्यांच्या कोशिका फुटू शकतात आणि यामुळे तुमचे डोळे लाल होऊ शकतात ज्यामुळे डोळ्यांमध्ये लाल गुठळ्या देखील तयार होऊ शकतात.

नमिता धुरी

मुंबई : डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील भाग मानला जातो. अनेकांना अशी सवय असते की ते सतत डोळ्यांना स्पर्श करत राहतात आणि चोळतात. याशिवाय अनेक वेळा डोळ्यांना खाज सुटल्यामुळे तुम्ही डोळ्यांना हाताने स्पर्श केला असेल.

असे केल्याने तुमच्या डोळ्यांना अनेक प्रकारे हानि पोहोचू शकते. ( side effects of frequently rubbing eyes) हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

कॉर्नियाला इजा

डोळ्यांना चोळल्याने कॉर्नियाला इजा होण्याची दाट शक्यता असते. यामुळे, तुम्हाला कॉर्नियावर ओरखडे देखील येऊ शकतात आणि तुम्हाला स्कार टिश्यू, कायमस्वरूपी दृष्टी समस्या यांसह अनेक समस्या असू शकतात.

काही वेळा इन्फेक्शन किंवा अॅलर्जीमुळेही डोळे लाल होण्याची समस्या उद्भवते. डोळ्यांवर अनपेक्षित दाब पडल्‍याने व्‍यागस नर्व्ह देखील सक्रिय होऊ शकते, ज्यामुळे तुमच्‍या हृदयाची गती कमी होऊ शकते.

डोळे लाल होतात

डोळ्यांना जोरात चोळल्याने त्यांच्या कोशिका फुटू शकतात आणि यामुळे तुमचे डोळे लाल होऊ शकतात ज्यामुळे डोळ्यांमध्ये लाल गुठळ्या देखील तयार होऊ शकतात.

इतकेच नाही तर डोळ्यांना जास्त चोळल्यामुळे काळी वर्तुळेही येतात, त्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग गडद होतो.

डोळ्यांना सूज

जर तुम्ही दिवसभरात अनेक वेळा डोळे चोळत असाल तर डोळ्यांमध्ये कंजक्टिवाइटिस नावाचा आजारही पसरू शकतो. तुमच्या बोटात अनेक विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे डोळ्यांमध्ये जातात, ज्यामुळे डोळे सुजतात आणि लाल देखील होऊ शकतात.

डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात दाह झाल्यामुळे तुमच्या डोळ्यात वेदना होतात आणि ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतात.

आपण वारंवार आपल्या डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे. जर तुम्ही अनेक वेळा डोळे चोळत असाल तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये धूसरपणा येऊ शकतो आणि डोळे जास्त प्रकाशासाठी संवेदनशील होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT