Sleep Timing google
आरोग्य

Sleep Timing : दुपारी झोपणं योग्य की अयोग्य? उन्हाळ्यात अनेक लोक दुपारी का झोप घेतात?

दुपारी झोपणे आपल्यासाठी योग्य की अयोग्य? हे समजून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Sleep Timing : झोप हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. माणूस झोपेसाठी काहीही करू शकतो. अनेक लोकांना झोप इतकी प्रिय असते की वेळ मिळेल तशी ते झोप घेतात तर काही लोक आवडीने आणि वेळ काढून दुपारी झोप घेतात पण दुपारी झोपणे आपल्यासाठी योग्य की अयोग्य? हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. (Sleep Timing : is it good to sleep in the afternoon why most of the people sleep in summer season in the afternoon

दुपारी झोपणे आपल्यासाठी योग्य की अयोग्य?

मुळात दुपारी जेवल्यानंतर खूप छान झोप येते पण दुपारी झोपणं प्रत्येकासाठीच योग्य असतं असं नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते दुपारी झोपल्यानं पोटाशी संबंधित समस्या, गॅस, अपचन याशिवाय लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्यानं कफ आणि पित्ताचं संतुलन बिघडू शकतं तर आयुर्वेदात काहीजणांना दुपारी झोपण्याची सवलत दिली आहे. त्यात विद्यार्थी, मजूर, वयस्कर लोक यांचा समावेश आहे.

अनेकांना झोप लागणे आणि भूक लागणे यात गोंधळ असतो. वास्तविक, असे लोक झोप लागल्यावर काहीतरी खाऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि भूक लागल्यावर झोपण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून भूक शांत होईल. पण हे अजिबात करू नये.

जर वेळेची कमतरता असेल तर तुम्ही पॉवर नॅप घेऊ शकता.तज्ज्ञांच्यामते दुपारी पॉवर नॅप घेणे ठीक आहे, परंतु यामुळे रात्री झोप न येण्याची समस्या देखील होऊ शकते.

अभ्यासानुसार, सुमारे 50% लोकांना दुपारी झोपेचा फारसा फायदा होत नाही. अशा लोकांमध्ये सर्केडियन रिदम असतो. सर्कॅडियन रिदम शरीराला कधी झोपायचे आणि कधी उठायचे हे सांगतो. जर तुम्हाला दिवसा झोप येत नसेल तर तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज नाही, हे दिसून येते.

उन्हाळ्यात अनेक लोक दुपारी का झोप घेतात?

निरोगी लोक फक्त उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी झोप घेतात. उन्हाळ्याच्या दिवसात रात्र लहान असते. यामुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. याशिवाय थकवा येतो म्हणून रात्री जास्तीत जास्त झोप मिळायला हवी.

जे लोक सकाळी लवकर दिवसाची सुरूवात करतात त्यांना दुपारी झोपायची आवश्यकता असू शकते. जेणे करून ताजंतवानं वाटेल...

- डॉ. अमित भोरकर

(Nutritionist & Dietician, Naturopathist )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Latest Marathi News Live Update: जोबिन जोसेफ यांची कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नवी दिल्ली येथील कार्यालयात 'वैयक्तिक प्रतिनिधी' म्हणून नियुक्ती

IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Pune Crime : 'त्या' जीम व्यावसायिकाला मारण्यासाठी २० लाख रुपयांची दिली होती सुपारी; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT