Sleep Weight Loss esakal
आरोग्य

Sleep Weight Loss : व्यायाम अन् डाएट करून नाही तर झोपूनही कमी करता येतं वजन, कसं? जाणून घ्या

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी डाएट आणि जीमला पर्याय काय, याच्या शोधात अनेकजण असतात.

धनश्री भावसार-बगाडे

Sleeping Weight Loss Tips In Marathi : वाढते वजन कमी कसे करायचे हा प्रश्न आता सर्वत्रच आढळतो. बहुतेक प्रत्येकच जण या प्रश्नाचं उत्तर शोधत असतो. त्यासाठी जीम, डाएट अशा वेगवेगळ्या पद्धतीने कष्ट घेतात. पण वजन झपाट्याने वाढण्याचे मुख्य कारण चुकीची जीवनशैली असते. ऑफीसमध्ये सतत एकाच जागी बसून कामामुळे वजन, पोटाची चरबी वाढते.

पण जर तुम्हाला घरीच बसून वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही झोपण्यापूर्वी या सोप्या टिप्स फॉलो करू शकतात.

Sleep Weight Loss

गाढ झोपेत वजन बऱ्याच प्रमाणात नियंत्रित होऊ शकते. त्यामुळे झोपे संदर्भात काही गोष्टींची काळजी घेतली तर वजन नियंत्रित राहू शकते. त्यामुळे पोटाची चरबीपण कमी होऊ शकते.

पुरेशी झोप आवश्यक

जर तुम्हाला वजन नियंत्रित करायचं असेल तर गाढ झोप आवश्यक असते. एका संशोधनानुसार तुम्ही रोज नीट झोप घेत असाल तर तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीला किमान ७-८ तासांची पुरेशी झोप घेणं आवश्यक असतं. जेव्हा झोप पुरेशी होते तेव्हा वजन नियंत्रित राहतं.

Sleep Weight Loss

आहारातील बदल

चांगल्या झोपेचा संबंध आहाराशी असतो. चांगली व गाढ झोप हवी असेल तर आहार काही बदल करणेही आवश्यक असते. यात रात्री हलके पदार्थ खावेत. पचण्यास सोपे असतात. जेवल्या जेवल्या झोपू नये. शिवाय जेवणानंतर किमान १० मिनीटे तरी चालावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT