Sneezing esakal
आरोग्य

Sneezing Disease : वारंवार शिंका येणे हासुद्धा एक आजार आहे, तुम्हाला माहिती होतं का? जाणून घ्या याबाबत सविस्तर

तुम्हालाही वारंवार शिंका येतात काय?

साक्षी राऊत

Health Care News : पावसाळ्यात फक्त स्किन आणि केसांशी संबंधित समस्याच वाढतात असे नाही. तर अ‍ॅलर्जी आणि इनफेक्शनशी संबंधित समस्याही वाढतात. पावसाळ्यात तुम्ही बऱ्याच लोकांना वारंवार शिंकताना बघितले असेल. त्यानंतर त्यांना तापही येतो. या समस्या मान्सूनच्या दिवसांत जास्त वाढतात. वारंवार शिंकल्याने बरेचदा अनेकांचे डोळेसुद्धा लाल होतात. तर काहींना थकवाही जाणवतो. यामागे बरीच कारणं असून शकतात. आज आपण या समस्येबाबात आणि यावरील उपायांबाबत सविस्तर जाणून घेऊया.

वारंवार शिंकणे हासुद्धा एक आजार आहे

वारंवार शिंका येणे ही खरं तर अॅलर्जेटिक रायनायटिसची समस्या आहे. ही समस्या पावसाळ्यात जास्त उद्भवते. पावसाळ्यात फुलांमधून निघणाऱ्या पोलन ग्रेन्समुळे ही समस्या वाढते.

याशिवाय पावसाळ्यात एसी, कूलरमध्ये काही माइट्स असतात जे या समस्येस ट्रिगर करतात. त्यामुळेच तुम्हाला वारंवार शिंका येतात. तसेच डोळ्यातून पाणी येणे, डोकेदुखी आणि तापाची समस्या उद्भवू शकते. (monsoon)

अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी हे घरगुती उपाय करा

हर्बल काढा

अॅलर्जीक रायनायटिसच्या समस्येत तुम्ही हा हर्बल काढा घेऊ शकता. का काढा गरम मसाल्यांच्या साहाय्याने बनवा. दालचिनी, लवंग यांचा त्यात वापर करा. याशिवाय त्यात हळद, तमालपत्र, आले आणि मीठही तुम्ही घालू शकता. हा हर्बल काढा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधक असतो. त्यामुळे तुम्हाला शिंकांपासून लगेच आराम मिळतो.

सरसोचे तेल गरम करून त्याची वाफ घ्या

या उपायासाठी शुद्ध सरसोचे तेल कढईत घालून गरम करा. जेव्हा त्यातून वाफ निघायला सुरुवात होईल तेव्हा तेव्हा ही वाफ नाकाने घ्या. ही वाफ तुमच्या छातीपर्यंत पोहोचून अॅलर्जी कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे तुमच्या शिंका कमी होतील आणि तुम्हाला आराम मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT