त्वचा उजळ आणि चमकदार दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. त्वचेची काळजी घेत असताना त्वचेच्या बाह्य काळजी सोबतच म्हणजेच विविध फेसपॅक, चेहरा स्क्रब Face Scrub करणं यासोबत त्वचेला योग्य पोषण मिळणं गरजेचं असतं. Special Recipe for Glowing Face Skin know about this juice
जर तुमच्या त्वचेला गरजेचं असलेलं योग्य पोषण मिळालं तर तुमची त्वचा निरोगी Healthy Skin राहील आणि चेहऱ्यावर ग्लो देखील येईल. जर तुम्ही देखील निस्तेज त्वचा, चेहऱ्यावरील डाग आणि वाढलेल्या सुरकुरकुत्यांमुळे चिंतेत असाल तर आम्ही तुम्हाला एका ज्यूसची खास रेसिपी Juice Recipe आणि त्याचे फायदे सांगणार आहोत.
या ज्यूसच्या नियमित सेवनामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होवून तुमची त्वचा तरुण दिसू लागेल.
अनेकदा तुमचं पोट योग्य प्रकारे किंवा नियमित साफ होत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. पोट साफ न झाल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. यासाठीच अननस, गाजर, लिंबू आणि आलं यांपासून तयार करण्यात आलेल्या या खास ज्यूसच्या सेवनामुळे त्वचा स्वच्छ होण्यासोबतच पोट साफ होण्यासही मदत होईल.
असा तयार करा ज्यूस
- सर्व प्रथम अननसाची साल काढून त्याचे तुकडे करून घ्या.
- त्यानंतर गाजर स्वच्छ धुवून गाजराचे देखील तुकडे करून घ्या.
- एका ब्लेंडरमध्ये अननसाचे तुकडे, गाजराचे तुकडे टाका.
- यात एक इंच आल्याचा तुकडा आणि १ चमचा लिंबाचा रस टाका आणि चांगलं ब्लेंड करून घ्या.
- त्यानंतर हा ज्यूस कापडाच्या मदतीने किंवा गाळणीने गाळून घ्या.
- ज्यूस काढण्यासाठी तुम्ही ज्यूसरचा वापरही करू शकता.
- या ज्यूसमध्ये तुम्ही आवडीप्रमाणे हवं असल्यास चिमूटभर काळं मीठ टाकू शकता.
हे देखिल वाचा-
अननस आणि गाजराच्या ज्यूसचे फायदे
अननसामध्ये मोठ्या प्रमाणात एस्कॉर्बिक ऍसिड आढळतं ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरील डाग फिके होतात. तसचं अननसामध्ये ब्रोमेलॅन आणि एंजाइमों असे काही घटक आढळतात ज्यांमध्ये असललेल्या अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे स्किन इंन्फेमेशनची समस्या दूर होते.
तर गाजरामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए मुळे त्वचेला पुरेसं पोषण मिळतं. नियमितपणे गाजरचं सेवन केल्यास त्वचेसोबतच केस आणि डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
तर या ज्यूसमध्ये असलेल्या लिंबाच्या रसामुळे त्वचेसाठी आवश्यक असेलेल्या व्हिटॅमिन सी मुळे कोलेजन प्राॅडक्शन वाढण्यास मदत होते. तसंच लिंबाच्या रसामधील सिट्रिक अॅसिडमुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील डाग दूर होवून त्वचा उजळण्यास मदत होते.
तर आल्यातील अँटीइंफ्लेमेटरी तत्वांमुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा तसंच सूज कमी होण्यास मदत होते. तसंच यातील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेच्या पेशींना पुरेसं पोषण मिळंत.
अशा प्रकारे तुमच्या आहारात या खास ज्यूसचा नियमितपणे समावेश केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. शिवाय त्वचा चमकदार आणि तरुण दिसू लागेल.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.