थंडावा देणारे ड्रायफ्रूट Esakal
आरोग्य

वाढत्या गरमीत शरीराला थंडावा देतील हे ५ Dry fruits

काही ड्रायफ्रूट्स असे आहेत. जे भिजवून खाल्ल्याने त्यातील गुणधर्मांचा शरीराला अधिक फायदा होते. यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते आणि थरीराला थंडावा मिळतो.

Kirti Wadkar

कडक उन्हाच्या झळांमुळे घराबाहेर पडणं कठीण झालंय. या वाढत्या गरमीत Summer अंगातून घामाच्या धारा वाहत असताना शरीराला थंड Cool ठेवण्यासाठी आपण अनेकजण उन्हाळ्यात थंड पेय किंवा रसाळ फळांचं म्हणजेच कलिंगड, टरबूज अशा फळांचं सेवन करतो.

उन्हाळ्यात वातावरणातील वाढत्या उष्णतेचा आपल्या शरीरावरदेखील विपरित परिणाम होत असतो. Summer Tips in Marathi some Dry fruits will keep you cool

यासाठीच शरीर थंड ठेवणं आवश्यक आहे. अशा वेळी उन्हाळ्यामध्ये तुम्ही काही ड्राय फ्रूट्सचा Dry Fruits तुमच्या नाश्त्यामध्ये Breakfast समावेश करू शकता. सुक्या मेव्यामधील अनेक गोष्टी या शरीरासाठी थंड आहेत. या ड्राय फ्रूट्सच्या सेवनामुळे तुम्हाला शरीर थंड ठेवण्यास मदत होईल. 

काही ड्रायफ्रूट्स असे आहेत. जे भिजवून खाल्ल्याने त्यातील गुणधर्मांचा शरीराला अधिक फायदा होते. यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते आणि थरीराला थंडावा मिळतो.

१. खजूर- उन्हाळ्यामध्ये अनेकदा खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूर थंड प्रकृती असेलेलं फळ आहे. तसंच खजुराच्या सेवनाने त्वरित एनर्जी मिळते.

यातील फायबरमुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. तसचं शरीरात आयरन शोषून घेण्यास खजूरातील गुणधर्मांचा फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणानंतर तुम्ही २-४ खजूर खावू शकता.

तसंच तुम्ही नाश्त्याच्यावेळी चहा ऐवजी खजूर स्मूदी देखील पिऊ शकता. या स्मूदीमध्ये तुम्हाला साखरेचा वापर करण्याची आवश्यकता नाही. कपभर दुधामध्ये ३-४ भिजवलेले खजूर टाकून मिस्करमध्ये याची स्मूदी बनवावी. या स्मूदीमुळे तुम्हाला दिवस भरासाठी एनर्जी मिळेल. लहान मुलांसाठीदेखील ही स्मूदी हेल्दी आहे.

२. किशमिश/ मनुका- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मनुकांचं सेवन पोटासाठी फायदेशीर ठरतं. रात्रभर भिजवलेले मनुका खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. यामुळे उष्माघाताचा त्रासही कमी होतो. मनुकाचं सेवन केल्याने पचन शक्ती सुधारते आणि तसचं मेटाबॉलिज्म देखील सुधारतं. 

तसचं उन्हाळ्यामध्ये भिजवलेल्या मनुक्याचं सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. यासाठी पेलाभर पाण्यात ८-१० मनुके भिजत ठेवा.

सकाळी हे पाणी प्या तसचं मनुका चावून खा. तसचं तुम्ही नाश्त्यामध्ये शिरा किंवा खीरमध्ये मनुका टाकून खावू शकता. तसचं स्मूदी आणि सलाडमध्येही मनुका समाविष्ट करू शकता. 

हे देखिल वाचा-

३. अंजीर- अनेक पोषक तत्व असलेले अंजीर शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं. सुक्या अंजीरच्या सेवनामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसचं पचन शक्तीही सुधारते.

तुम्ही उन्हाळ्यात दररोज सुक्या २-३ सुके अंजीर खावू शकता. तसचं तुम्ही ४-५ तास पाण्यात भिजवलेले अंजीर सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने ते शरीरासाठी जास्त गुणाकारी ठरतात.

दूधासोबत अंजीर खाणंही फायद्याचं ठरू शकतं. तुम्ही अंजीरचा आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे समावेश करू शकता. रात्रभर भिजवलेले अंजीर दूधासोबत मिस्करमध्ये ग्राइंड करून थंडगार अंजीर स्मूदीचा आनंद तुम्हाला घेता येईल.

तसचं तुम्ही  नाश्त्यामध्ये ओट्स किंवा सिरियल्समध्ये भिजवलेले अंजीर टाकून त्याचा स्वाद वाढवू शकता. 

४. जर्दाळू- जर्दाळूचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. जर्दाळूच्या सेवनाने शरीरातील फॅट्स आणि ट्राइग्लिसराइड नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसंच मेंदूच्या आरोग्यासाठी देखील यातील गुणधर्म फायदेशीर ठरतात. जर्दाळूमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुले पोटातील जळजळ कमी करण्यास ते उपयुक्त ठरतात.

यात उपलब्द असलेल्या फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसचं बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होते.

जर्दाळू हे पोटासाठी थंड असल्याने उन्हाळ्यात त्याचे सेवन फायदेशीर ठरतं. रात्रभर पाण्यात भिजवलेले जर्दाळू तुम्ही चावून खावू शकता. किंवा जर्दाळूची स्मूदी तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता.

५. चिया सीड्स- चिया सिड्स हे शरिरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. चिया सीड्स शरिरासाठी थंड असल्याने उन्हाळ्यात याच्या सेवनाने पोटाला आराम मिळतो.

एक चमचा चिया सिड्स पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंचर ते पूर्णपणे फुगल्यानंतर तुम्ही फालुदा, सरबत किंवा स्मूदीसोबत त्याच सेवन करू शकता. 

अंजीर, खजूर, जर्दाळू, मनुका हे सर्व ड्रायफ्रूट्स उन्हाळ्यात भिजवून खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळू शकतो. यासाठी तुम्ही या ड्राय फ्रूट्सची एकत्र स्मूदी देखील बनवून तिचा आहारात समावेश करू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT