Swimming Benefits esakal
आरोग्य

Swimming Benefits : रोज स्विमिंग केल्यास तुमच्या शरीराला मिळतील 5 जबरदस्त फायदे, एकदा वाचाच

चला तर आज पोहोण्याचे जबरदस्त फायदे जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

Swimming Benefits : शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात, चालतात, तर कधी योगाची मदत घेतात. बर्‍याच वेळा तेच तेच उपाय करूनही लोक कंटाळतात. तेव्हा आज आम्ही तुम्हाला फिटनेस रुटीनमध्ये स्विमिंगचा समावेश करण्याचे काही फायदे सांगणार आहोत. शरीर निरोगी ठेवण्यासोबतच पोहणे मानसिक शांतीसाठीही खूप फायदेशीर आहे.

दररोज अर्धा तास पोहल्याने कॅलरीज बर्न करण्यासोबतच शरीरही निरोगी राहते. पोहण्याने मूड फ्रेश होतो आणि तणावही कमी होतो. असे केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि मनालाही शांती मिळते. चला तर आज पोहोण्याचे जबरदस्त फायदे जाणून घेऊया.

कॅलरीज बर्न करण्यासाठी उपयोगी

दररोज पोहण्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि शरीर तंदुरुस्त राहते. पोहण्याने चालण्यापेक्षा कॅलरी जलद बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

नैराश्य कमी करण्यासाठीही फायद्याचे

रोज पोहल्याने मनाला शांती मिळते. यामुळे नैराश्य कमी होण्यासोबतच चिंतेची समस्याही दूर होते. पोहण्यामुळे चांगली झोप लागते. त्यामुळे नैराश्यही कमी होते. पोहणे देखील मूड फ्रेश ठेवते आणि नैराश्याची लक्षणे कमी करते.

रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त

पोहल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात रक्ताचा प्रवाह लवकर होतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासोबतच हृदयही दीर्घकाळ निरोगी राहते. दररोज अर्धवट पोहण्याने हृदयाशी संबंधित आजार बरे होऊ शकतात. (Health)

Swimming Benefits

शरीर लवचिक बनते

रोज पोहल्याने शरीर लवचिक तसेच चपळ बनते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे, जो शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासह शरीर लवचिक बनवण्यास मदत करतो. दररोज अर्धा तास पोहणे सहज शक्य आहे. (swimming)

हाडे मजबूत होतात

रोज पोहल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडांचे दुखणेही सहज निघून जाते. असे नियमित केल्याने हाडांना बळ मिळते आणि ते दीर्घकाळ निरोगी राहतात. असे केल्याने भविष्यात संधिवात होण्याची शक्यताही कमी होते.

रोज पोहल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मात्र, तुम्हाला कोणताही आजार किंवा अॅलर्जीची समस्या असल्यास डॉक्टरांना सांगूनच सुरुवात करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT