Symptoms Of Blood Cancer  esakal
आरोग्य

Symptoms Of Blood Cancer : 'ही' लक्षणं सांगतात तुमच्या शरीरात वाढताय ब्लड कँसरचे विषाणू

लक्षणे ओळखण्यास उशीर झाल्यास रूग्णाला त्याचा जीवही गमवावा लागू शकतो

सकाळ डिजिटल टीम

Symptoms Of Blood Cancer : ब्लड कँसर हा एक घातक आजार असून याची सुरुवातीची लक्षणं वेळेत लक्षात आली तर योग्य उपचार घेण्यास मदत होते. मात्र बऱ्याच जणांना ब्लड कँसरची लक्षणं माहिती नसतात. मात्र ही लक्षणं प्रत्येकालाच माहिती असणं फार गरजेचं आहे. लक्षणे ओळखण्यास उशीर झाल्यास रूग्णाला त्याचा जीवही गमवावा लागू शकतो.

ब्लड कँसरची लक्षणे

बऱ्याच केसेसमध्ये ब्लड कँसरची सुरुवात बोन मॅरोमध्ये सुरु होते. हे सॉफ्ट स्पंजी टिश्यू असतात जे हाडांच्या आत असतात, ज्यामध्ये ब्लड सेल्सची निर्मिती होते.

ब्लड कँसरचे प्रकार

ल्यूकेमिया

लिंफोमा

मायलॉइड्सप्लास्टिक सिंड्रोम

मायलोप्रोलिफेरेटिव डिसॉर्डर

मल्टीपल मायलोमा

या सगळ्यांचा वेगवेगळया प्रकारे आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. तेव्हा याच्या सुरुवाती लक्षणांकडे अजिबात दूर्लक्ष करू नये. चिंतेची बाब म्हणजे काही रूग्णांना अजिबात लक्षणे दिसत नाहीत.

या लक्षणांकडे दूर्लक्ष करू नका

खोकला किंवा छातीत दुखणे

ब्लड कँसर असल्यास तुम्हाला खोकला किंवा छातीत दुखण्याचा त्रास होऊ शकतो.

सतत व्हायरल होणे

तुम्ही सतत आजारी पडत असाल तर किंवा तुम्हाला अगदी सहज ताप किंवा थंडी वाजत असेल तर हे तुमच्या शरीरातील व्हाइट ब्लड कार्पस्कल्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

लगेच जखम होणे आणि त्यातून रक्त वाहणे

तुमच्या शरीरावर सतत दाणेदार पुरळ येत असतील आणि त्यातून रक्त बाहेर येत असेल तर ही ब्लड कँसरची लक्षणं असू शकतात. (Health)

भूक न लागणे

भूक न लागणे किंवा अस्वस्थ वाटणे ही कँसरची लक्षणं असू शकतात.

कायम थकवा येणे

कायम थकवा येणे हे ब्लड कँसरचे लक्षण असू शकते. असे रेड ब्लड कार्पस्कल्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला अॅनिमियासुद्धा होऊ शकतो.

ब्लड कँसरच्या या लक्षणांकडे अजिबात दूर्लक्ष करू नका

रात्री घाम येणे, श्वासाची कमतरता, मानेत आणि लिंफ नोडमध्ये सूजन येणे, वजन कमी होणे, ब्रश करताना रक्त येणे ही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: जागतिक बाजार घसरले, पण भारतीय बाजार चमकला! सेन्सेक्स 344 अंकांनी उसळला; Meta मुळे 'हा' शेअर तेजीत

Chhatrapati Sambhajinagar:हवाई सफरलाही महागाईची झळ!; छत्रपती संभाजीनगर-नवी मुंबई, बंगळुरू विमानसेवांच्या फेऱ्यांत होणार कपात

Yavatmal Couple Death : लग्नाला झाले होते अवघे 34 दिवस! 24-19 वयाच्या नवविवाहित जोडप्यानं विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन, दवाखान्यातून परतले अन्...

Vaibhav Sooryavanshi Next Match Date: पहिल्या सामन्यात १४ धावा, वैभवची पुढील मॅच कधी? जाणून घ्या India A चे पुढील वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : जागतिक बाजार घसरले असताना भारतीय शेअर बाजारात तेजी

SCROLL FOR NEXT