Tadasana Benefits: Sakal
आरोग्य

Tadasana Benefits: ताडासन केल्याने आळस होईल दूर, जाणून घ्या योग्य पद्धत

ताडासन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

पुजा बोनकिले

Tadasana health Benefits increase activeness

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. यामुळे अनेक लोकांना नेहमी आळशीपणा जाणवतो. पण योग केल्याने शरीरात ऊर्जा वाढू शकते. यासाठी ताडासन करणे फायदेशीर ठरू शकते.

ताडासन हा योग करायला सोपा आहे. हा योग तुमच्या शरीराची स्थिती सुधारते आणि श्वासोच्छवासावर नियंत्रण वाढवते. याशिवाय याचा तुमच्या मूडवर सकारात्मक परिणाम होतो. ताडासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घेऊया.

ताडासन हे तणाव करण्यासाठी तसेच मेंदुला शांत करण्यासाठी फार महत्वाचे आहे. तसेच हा योग केल्याने शरीराचा तोल संतुलित राहतो.

ताडासन कसे करावे

सर्वात आधी एका जागेवर सरळ उभे राहावे.

समोरच्या दिशेने पाहावे.

त्यानंतर दोन्ही हात हळूहळू वर घ्यावे आणि एकमेकांना जोडावे.

हे करत असताना कानाला टच करून खांदेवर करावे.

डोकं सरळ ठेवावे.

या स्थितीत 15 ते 20 वेळा दिर्घ श्वास घ्यावा.

ताडासन करण्याचे फायदे

शरीराचे संतुलन सुधारते

सायटिका दुखण्यापासून आराम मिळतो

शरीर ऊर्जावान बनवते

शरीराचे रक्ताभिसरण सुरळित होते

कंबर आणि पायांचे स्नायू मजबूत होतात

नियमितपणे हा योग केल्याने वजन नियंत्रणात राहते

तणाव कमी करायचा असेल तर ताडासन करावे.

ताडासन केल्याने शरीर तंदुरूस्त होते आणि उंची वाढण्यास मदत मिळते.

ताडासन करताना कोणती काळजी घ्यावी

ताडासन करताना शरीर सरळ ठेवावे. डोके, मान आणि पाठीचा कणा समान स्थितीत, उभ्या असावा. कंबरेचा खालचा भाग जमिनीला घट्ट चिकटलेला असावा. कमरेच्या वरचा भाग सामान्य आणि आरामदायक असावा. ताडासनाचा सराव हळूहळू आणि आरामात करावा. ताडासन करताना दीर्घ श्वास घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT