Summer Care  esakal
आरोग्य

Summer Care : उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी आरोग्याची अशी घ्या काळजी

Summer Care : एप्रिलच्या सुरुवातीपासूनच सूर्य तळपत आहे. दिवसेंदिवस पारा वाढत असून आतापासूनच आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

Summer Care : मार्चच्या सुरुवातीपासूनच सूर्य तळपत आहे. दिवसेंदिवस पारा वाढत असून आतापासूनच आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. घरात तसेच रखरखत्या उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी काही गोष्टी कटाक्षाने पाळण्याची गरज आहे. त्यामुळे शरीराची लाही लाही करणारा उन्हाळा सहज निघून जाईल.

काय करावे ?

  • आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा.

  • सुती, फिक्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.

  • डोक्याला टोपी व डोळ्यांना गॉगल वापरा.

  • झळा लागू नये यासाठी संपूर्ण अंग झाकलेले असावेत.

  • ताप आल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

  • थंड पाण्याने स्नान करावे. दुपारी अर्धा तास झोपावे.

  • उन्हातून आल्यास लगेच पाणी पिऊ नये.

  • ताक, कैरीचे पन्हे, कोकम किंवा लिंबू सरबत घ्यावे.

  • आहार हलक्या स्वरूपाचा ठेवावा.

काळजी न घेतल्यास होणारे परिणाम

हातपाय दुखणे, पोटात मळमळणे, किडनी स्टोन, उलट्या जुलाब, चक्कर येणे, डिहायड्रेशन मुत्र विकाराच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याविषयक कोणतीही लक्षण दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजारावर घरगुती उपाय करणे तसेच तळलेले व मसाल्याचे पदार्थ टाळावे.

- डॉ. अर्चना कोठारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT