Health Care esakal
आरोग्य

Health Care : मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आरोग्याची अशी घ्या काळजी

Health Care : जो मानसिक आरोग्यासाठी निरोगी शरीर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तोच खरा आरोग्यदायी नागरिक असतो.

सकाळ वृत्तसेवा

Health Care : पैसा, जमीन किंवा इतर कोणतीही मालमत्ता असली तरी आरोग्यदायी जीवन नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही. मन आणि शरीर निरोगी असावे. जो मानसिक आरोग्यासाठी निरोगी शरीर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, तोच खरा आरोग्यदायी नागरिक असतो. त्यामुळे माझे आरोग्य, माझी संपत्ती असा विचार मनात रुजविला तर अनारोग्य दूर ठेवता येईल. आरोग्य राखण्यासाठी काय करावे याचा हा मागोवा.

आहार सांभाळणे

  • सकस आहार घ्यावा.

  • मैदा असलेले खाद्यपदार्थ टाळावे.

  • साखरेसह रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.

  • जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नये.

  • रोज विविधरंगी भाज्या आणि फळे खावी.

रोजच्या आहारात काय असावे

  • डाळ, मटकी हा जेवणाचा भाग असावा.

  • तीळ, जवस चटणी यांचा जेवणात समावेश असावा.

  • ज्वारी, नाचणी व बाजरीचा आहारात समावेश करावा.

  • भरपूर पाणी प्यावे. ऋतूप्रमाणे आहार घ्यावा.

आहाराच्या वेळेचे असे असावे नियोजन

  • नाश्ता : सकाळी ८.३० ते ९.३०

  • दुपारचे जेवण : दुपारी १२. ३० ते १.३०

  • सायंकाळचा नाश्ता : सायंकाळी ४.३० ते ५

  • रात्रीचे जेवण : रात्री ७ ते ८

आरोग्यदायी जगण्यासाठीचे गणित

  • योग्य झोप घेणे आवश्यक

  • प्रौढ व्यक्तीने दररोज किमान सात तास झोपावे.

  • नियमित व्यायाम करावा.

  • वजनावर नियंत्रण ठेवावे.

  • मद्यपान, धुम्रपानापासून दूर राहावे.

  • वैयक्तिक स्वच्छता राखावी.

नियमित व्यायामाने शारीरिक ताण कमी होतो. पेशींना ऑक्सिजन मिळण्यासाठी रक्तप्रवाहाला चालना मिळते. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे वजन तपासणी करावी. आहार आणि व्यायामाचे नियोजन करावे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वैद्यकीय तपासणी करणे, आजारी असताना वैद्यकीय मदत घ्यावी.

डॉ. रेणुका माईंदे, आहार तज्ज्ञ, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

नवरा कोट्यवधींचा मालक तरीही लोकप्रिय अभिनेत्रीवर आली शेण उचलायची वेळ? व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT