Benefits of Cardamom  esakal
आरोग्य

Benefits of Cardamom : जेवण केल्यानंतर वेलचीचे सेवन करणे आहे लाभदायी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

वेलची ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Cardamom : स्वयंपाकघरातील अतिशय महत्वपूर्ण असलेला घटक म्हणजे वेलची होय. वेलचीचा वापर अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून केला जातो. इतकच काय तर चहामध्ये देखील वेलचीचा वापर केला जातो. गोड पदार्थ असुदे किंवा तिखट अनेक प्रकारच्या रेसिपींमध्ये वेलचीचा वापर केला जातो.

वेलचीची बी, तेल आणि अर्क हा अतिशय प्रभावी आणि औषधी मानला जातो. त्यामुळे, वेलची ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. जेवण केल्यानंतर जर तुम्ही वेलचीचे सेवन केले तर याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतील. माऊथ फ्रेशनर म्हणून ही वेलचीचा वापर केला जातो. वेलची खाण्याचे फायदे  कोणते आहेत? चला तर मग जाणून घेऊयात.

वेलची खाण्याचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे

स्नायूंना ठेवते तंदूरूस्त

वेलचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिन्ट्स आढळून येतात. जे आपल्या शरीरातील स्नायूंना तंदूरूस्त ठेवण्याचे काम करते. मात्र, जर तुम्ही जास्त प्रमाणात वेलचीचे सेवन केले तर आपल्या शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे, पोट खराब होण्याची शक्यता असते.

तोंडाची दुर्गंधी दूर होते

वेलची ही अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणांनी युक्त आहे. त्यामुळे, तोंडात वास येत असेल किंवा दुर्गंधी येत असेल तर वेलची त्यावर माऊथ फ्रेशनरप्रमाणे काम करते. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर वेलची खाल्ल्याने दुर्गंधीची समस्या दूर होते.

यासाठी तुम्ह वेलचीची पूड करून ती पाण्यात उकळून पिल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते. शिवाय, दात किडण्यापासून ही तुम्हाला आराम मिळतो.

पचनक्षमता सुधारते

छोट्या वेलचीचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या जसे की, अ‍ॅसिड रिफ्लॅक्स, पोटदुखी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या टाळली जाऊ शकते. शिवाय, वेलचीमध्ये असलेले बायोअ‍ॅक्टिव्ह घटक आपल्या शरीरातील पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. वेलचीचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि आपली पचनक्षमता सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT