Frozen Food Side Effects esakal
आरोग्य

Frozen Food Side Effects : फ्रोझन फूड खाताय? मग, आरोग्यावर होणारे ‘हे’ दुष्परिणाम घ्या जाणून

फ्रोझन फूड आरोग्यासाठी किती घातक आहे? हे तुम्हाला माहित आहे का?

Monika Lonkar –Kumbhar

Frozen Food Side Effects : रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना कमी वेळेत होणारे आणि झटपट खायला मिळणारे खाद्यपदार्थ आवडतात. या खाद्यपदार्थांमध्ये फ्रोजन फूड आणि पॅकबंद खाद्यपदार्थांचा समावेश होतो.

या प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्याचा लोकांचा ट्रेंड देखील वाढला आहे. कामाच्या व्यस्त शेड्यूलमुळे लोकांनी ताजे अन्न बनवण्याऐवजी बाजारातून तयार फ्रोजन फूड खाण्यावर आणि ते खेरदी करण्यावर भर दिला आहे.

मात्र, हे फ्रोझन फूड आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे? हे तुम्हाला माहित आहे का? या फ्रोझन फूडमध्ये हायड्रोजनेटेड पाम तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या तेलामध्ये हानिकारक ट्रान्स फॅट्स असतात. या तेलासोबतच सोडिअमचा वापर ही मोठ्या प्रमाणात केला जातो.

त्यामुळे, याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. या फ्रोझन फूडच्या सेवनामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. कोणते आहेत हे आजार? चला तर मग जाणून घेऊयात.

मधुमेहाचा धोका

फ्रोझन फूडमध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चचा वापर केला जातो. ज्यामुळे, या प्रकारचे खाद्यपदार्थ किती ही दिवस टिकू शकतात. मात्र, यातील स्टार्च आपल्या पोटात गेल्यानंतर त्याचे पचन होण्यापूर्वीच स्टार्चचे साखरेत रूपांतर होते. परिणामी, आपल्या शरीरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे, मधुमेहाचा धोका वाढतो.

रक्तदाब वाढतो

फ्रोझन फूड आणि पॅकबंद असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढू शकते, असे संधोधनातून समोर आले आहे. फ्रोझन फूडमध्ये हायड्रोजनेटेड पाम तेलाचा आणि सोडिअमचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे, या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे स्ट्रोक्स आणि हृदयविकार सारख्या समस्यांचा धोका देखील वाढतो.  

वजन वाढते

फ्रोझन फूड हे अनेक दिवसांपासून गोठवलेले असतात. त्यामुळे, त्यातील पौष्टिक घटक, व्हिटॅमिन्स आणि खनिजे नष्ट झालेली असतात. या उलट ताज्या शिजवलेल्या अन्नामध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर आढळून येते.

शिवाय, फ्रोझन फूडमध्ये फॅट्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, या खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT