Immunity Booster  esakal
आरोग्य

Immunity Booster : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे झिंक; ‘या’ खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश

कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणे महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Immunity Booster : सध्या देशभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची प्रकरणे वाढताना दिसत आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणे गरजेचे आहे.

त्यासाठी आपले शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण आहारात जीवनसत्वे, खनिजे आणि झिंकयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करणे फायद्याचे ठरेल. या गोष्टींच्या कमतरतेमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.

झिंकयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे, आज आपण झिंकयुक्त खाद्यपदार्थ कोणते आहेत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

दही

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही हे अतिशय फायदेशीर आहे. शिवाय, दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगले बॅक्टेरिया आढळून येतात. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे, दह्याचे सेवन प्रमाणात करणे गरजेचे आहे.

दह्यामुळे आपले शरीर आतून थंड होते. शिवाय, पचनक्षमता सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दही अतिशय फायदेशीर आहे. दह्यामध्ये झिंकचे मुबलक प्रमाण आढळून येते. त्यामुळे, दह्याचा आहारात अवश्य समावेश करा.

अंडी

प्रथिने आणि झिंकचा उत्तम स्त्रोत म्हणून अंड्याला ओळखले जाते. अनेकांना हिवाळ्यात अंडी खायला आवडतात. अंड्यांमुळे आपल्या शरीराला ताकद तर मिळतेच शिवाय, शरीरातील झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी अंडी अतिशय लाभदायी आहे.

त्यामुळे, तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा अवश्य समावेश करा. यामुळे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होईल.

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्स तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. मूठभर काजू, बदाम किंवा मिक्स ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. या ड्रायफ्रूट्समध्ये हेल्दी फॅट्स, झिंक, फायबर्स, जीवनसत्वे आणि खनिजे यांचे भरपूर प्रमाण आढळून येते.

त्यामुळे, शरीरातील झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही दररोज मूठभर ड्रायफ्रूट्स अवश्य खा. विशेष म्हणजे काजूमध्ये झिंकचे विपुल प्रमाण आढळून येते. काजूमध्ये दैनंदिन गरजेच्या 15% झिंक आढळून येते.

शिवाय, ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्यने हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह सारख्या आजारांपासून ही आपले संरक्षण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT