Weight Loss Tips esakal
आरोग्य

Weight Loss Tips : वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, चरबी विरघळण्यास होईल मदत

Weight Loss Tips : वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Weight Loss Tips : सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अन् व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब इत्यादी समस्यांचा समावेश आहे. आजकाल तर अगदी किशोरवयीन मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वांमध्ये ही लठ्ठपणाची समस्या आढळून येते.

मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जातात. कधी एखाद्या डाएटची मदत घेतली जाते तर कधी एखाद्या वर्कआऊटची. पण, हे सर्व करत असताना तुम्ही आहाराकडे ही विशेष लक्ष द्यायला हवे. वजन कमी करायचे म्हणजे आहार पूर्ण कमी करायचा असे नव्हे, तर शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पोषकतत्वांचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे होय.

ही पोषकतत्वे आपल्या शरीराला विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमधून मिळतात. आज आपण अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये फायबर्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. यासोबतच विविध प्रकारची जीवनसत्वे, खनिजे यांचे विपुल प्रमाण ब्रोकोलीमध्ये असते. महत्वाची बाब म्हणजे ब्रोकोलीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे, ब्रोकोलीचा आहारात समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्समध्ये पोषकतत्वांचा आणि फायबर्सचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे, ड्रायफ्रूट्स खाल्ल्यानंतर आपले पोट बराच वेळ भरलेले राहते. याशिवाय, प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून ही ड्रायफ्रूट्सला ओळखले जाते. त्यामुळे, ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्याने लवकर भूक लागत नाही आणि शरीराला योग्य प्रमाणात पोषण ही मिळते. वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात ड्रायफ्रूट्सचा अवश्य समावेश करा. परंतु, या सुकामेव्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

चिया सीड्स्

चिया सीड्स याला आपण सब्जा असे म्हणतो. वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स अतिशय फायदेशीर मानल्या जातात. या चिया सीड्समध्ये असलेले फायबर आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड वजन कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे, चिया सीड्सचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. शिवाय, चिया सीड्स हृदयासाठी देखील फायदेशीर आहेत. त्यामुळे, तुमच्या आहारात या चिया सीड्सचा जरूर समावेश करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT