Health Care
Health Care esakal
आरोग्य

Health Care : सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचे करा सेवन

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : सध्या देशातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात.

अशा परिस्थितीमध्ये अनेक जण डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घेतात. अनेकदा या औषधोपचारांची या हंगामी सर्दी-खोकल्यासाठी गरज ही नसते. तुम्ही काही औषधी वनस्पतींचे सेवन केल्याने ही सर्दी-ताप आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो.

काही जण डॉक्टरांकडील गोळ्यांचा कोर्स १-२ दिवसांमध्ये सोडतात, त्यामुळे, सर्दी-खोकल्याची समस्या काही थांबण्याचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

काही औषधी वनस्पती आहेत, ज्यांचा वापर केल्यावर सर्दी-ताप आणि खोकल्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. चला तर मग आपण त्या औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेऊयात.

तुळस

तुळस ही एक अशी औषधी वनस्पती आहे, जी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सर्दी-खोकला आणि तापापासून आराम मिळवून देण्याचे काम तुळस करते.

तुळशीचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही तुळशीच्या पानांचा काढा करून पिऊ शकता किंवा सॅलेडच्या रूपात ही तिचा वापर करू शकता. तुळशीची पाने चघळल्याने देखील तुम्हाला सर्दी-ताप आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो.

लसूण

लसणाचा वापर हा अनेक औषधांमध्ये केला जातो. लसणामध्ये ऍलिसिन नावाचे एक संयुग आढळून येते. या संयुगामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. या संयुगाच्या अँटीव्हायरल गुणधर्मांमुळे सर्दी-ताप आणि खोकल्याची लक्षणे कमी होऊ शकतात.

सर्दी-खोकला आणि तापापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जेवणासोबत भाजलेले लसूण खाऊ शकता. तसेच, स्वयंपाक करताना भाज्यांमध्ये या भाजलेल्या लसणाचा वापर करू शकता. मूळात लसणाचा स्वभाव हा उष्ण आहे. त्यामुळे, लसणाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला ऊबदारपणा मिळतो. शिवाय, तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

अडूळसा

अडूळसा ही औषधी वनस्पती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अडूळश्याच्या पानांचा रस करून त्यात मध मिसळून हा रस प्यायल्याने तुम्हाला सर्दी-ताप आणि खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

विशेष म्हणजे अडूळश्याची पाने, फुले आणि मूळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे, या वनस्पतीच्या पानांचा, फुलांचा आणि मूळांचा अनेक औषधांमध्ये वापर केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT