Health Care sakal
आरोग्य

Health Care : रात्रभर वारंवार खोकला येतोय? मग, ‘या’ सोप्या घरगुती उपायांची घ्या मदत

या खोकल्याकडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही मोठ्या गंभीर आजाराला बळी पडू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : अनेकांना रात्री झोपताना वारंवार खोकला येतो. या वारंवार येणाऱ्या खोकल्यामुळे मग रात्रीची झोप खराब होते. ही झोप खराब झाली की, पुन्हा झोप येत नाही. सकाळी उठल्यानंतर अनेक जण हा रात्रीचा खोकला विसरून ही जातात. मग, त्यावर उपचार देखील केले जात नाही.

तुम्हाला जर रात्रीचा वारंवार खोकला येत असेल तर याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण, या खोकल्याकडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही मोठ्या गंभीर आजाराला बळी पडू शकता. हा खोकला गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. त्यामुळे, यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.

रात्रीचा हा वारंवार येणारा खोकला थांबवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. कोणते आहेत हे घरगुती उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.

गरम पाणी प्या

खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी सर्वात आधी गरम पाणी प्या. हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. हे गरम पाणी पिताना हळूहळू पिणे गरजेचे आहे. असे केल्याने हे गरम पाणी घशापर्यंत पोहचते आणि घशातील खवखव आणि जळजळ दूर होण्यास मदत होते.

गरम पाणी पिल्याने फुफ्फुसात जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे, खोकला सहज बाहेर पडतो. त्यामुळे, गरम पाणी पिणे हा खोकल्यासाठीचा सोपा आणि लाभदायी उपाय आहे.

तुळशीच्या पानांचा काढा

तुळस ही सर्वात प्रभावी असलेली औषधी वनस्पती आहे. तुळशीचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. सर्दी, खोकला आणि ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा काढा आवर्जून प्यायला जातो.

जर तुम्हाला रात्री वारंवार खोकला येत असेल तर, तुळशीच्या पानांचा काढा करून अवश्य प्या. हा उपाय करण्यासाठी १ कप पाण्यात तुळशीची पाने उकळून घ्या. ही पाने ५-१० मिनिटे चांगली उकळू द्या. त्यानंतर, हे गरम पाणी प्या.

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि वेदना कमी करणाऱ्या गुणधर्मांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, घसा खवखवण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच, खोकल्यापासून आराम देखील मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT