Yoga For Active Body  esakal
आरोग्य

Yoga For Active Body : आळस घालवण्यासाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने; शरीरात येईल चपळता

आळस घालवण्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Active Body : आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत. ज्यांना दिवसभरात सतत सुस्ती येते. सुस्तीमुळे त्यांना आळस ही प्रचंड येतो. या आळसामुळे मग अशा लोकांचे कामात मन लागत नाही. त्यांना सतत लोळत पडावे वाटते, सतत झोप घ्यावी वाटते.

मात्र, हा आळस घालवण्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. योगामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, आळस घालवण्यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.

योगामुळे, शरीरातील आळस ही जाईल आणि शरीरात चपळता येण्यास मदत होईल. कोणती आहेत ही योगासने? ज्यामुळे, आळस दूर पळून जाईल आणि शरीरात चपळता येईल. चला तर मग जाणून घेऊयात.

सेतूबंधासन

हे योगासन आपल्य शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. सेतूबंधासन योगासन रोज केल्याने तुमचे शरीर लवचिक होण्यास मदत होईल. शिवाय, शरीरात चपळता येईल.

हे योगासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :

  • सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर पालथे झोपा आणि हलका श्वास घ्या.

  • त्यानंतर, दोन्ही हात बाजूला ठेवा.

  • आता सावकाशपणे दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून नितंबाजवळ आणण्याचा प्रयत्न करा.

  • या स्थितीमध्ये कंबर जितकी वर उचलता येईल, तितकी उचलण्याचा प्रयत्न करा.

  • दोन्ही हात मात्र, जमिनीवरच ठेवा आणि १५ सेकंदासाठी श्वास रोखून धरा. आता तुम्हाला शरीराला चांगला ताण बसलेला जाणवेल.

  • यानंतर, श्वास सोडून पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

बालासन

शरीरातील सर्व आळस आणि थकवा दूर करण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि शरीर रिलॅक्स ठेवण्यासाठी प्रामुख्याने हे योगासन केले जाते.

हे योगासन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वात आधी योगा मॅटवर वज्रासनात बसा.

  • आता दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ रेषेत न्या.

  • आता श्वास सोडत दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा.

  • या स्थितीमध्ये तुमची पाठ सरळ ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे डोके जमिनीला टेकवा.

  • आता या स्थितीमध्ये तुम्हाला शरीराला ताण जाणवेल. आता श्वास रोखून ३० सेकंद या स्थितीमध्ये रहा.

  • नंतर, श्वास सोडत पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT