Health esakal
आरोग्य

Health: जगभरातील लोकसंख्येस नपुंसक बनवू शकतं 'हे' धोकादायक सुपरबग, तज्ज्ञ म्हणाले...

सुपरबग मानवी शरीरात सेक्शुअल ट्रांसमिटेड डिसीज पसरवतो

सकाळ डिजिटल टीम

Disease: अमेरिकेच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपरबगचा संसर्ग चिंतेचा विषय बनलाय. सुपरबग मानवी शरीरात सेक्शुअल ट्रांसमिटेड डिसीज पसरवतो. ज्यामुळे अनेकजण इनफर्टीलिटीला बळी पडतात. सुपरबग साधरणत: बॅक्टेरियाचाच एक प्रकार आहे. मात्र हे बॅक्टेरियापेक्षा जास्त घातक आहे. या सुपरबगचं नाव आहे मायकोप्लाझमा जेनिटेलियम आहे. हा सुपरबग इतका घातक आहे की, उपचारादरम्यान अँटिबायोटिकचा वापर केल्यास सुपरबग त्याच्या विरोधात रेझिस्टंट (Resistant) डेवलप करतात. त्यामुळे या संसर्गाचं निदान करणं डॉक्टरांपुढचंही मोठं चॅलेंज आहे.

सुपरबग हा बॅक्टेरिया पहिल्यांदा १९८० मध्ये लंडनमध्ये आढळला होता. मात्र या संसर्गाचा शोध लावण्यासाठी पहिल्यांदा २०१९ मध्ये अमेरिकेत याचं परिक्षण केल्या गेलं. हे परिक्षण सध्या अमेरिकेपूर्ती मर्यादित असून शास्त्रज्ञांना आता हा संसर्ग कुठल्या कुठल्या देशात पसरत चाललाय याबाबत अजूनही शाश्वती नाही.

काय सांगतात तज्ज्ञ

शास्त्रज्ञांनी केलेल्या रिसर्चमध्ये शंभर व्यक्तींमधून एक व्यक्ती M.Genetaliumने बाधित असल्याचे आढळून आले. मात्र शास्त्रज्ञांच्या मते, लोकांमध्ये या संसर्गाचं प्रमाण वाढत चाललंय. सुपरबग बॅक्टेरिया नपुंसकता, प्रीमॅच्युअर बर्थ, गर्भपात, गर्भाशयात सूजन येणे तसेच या संबंधित अनेक समस्या निर्माण करतं. मात्र शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय म्हणजे सुपरबर्ग या संसर्गाविरोधातील औषधे वापरूनही शरीरात अँटी रेझिस्टंट तयार करतात. त्यामुळे या रोगाचं निदान कठिण होत जातं.

शास्त्रज्ञांच्या मते, या रोगाच्या निदानादम्यान गर्भवती महिलांसांठी हा संसर्ग जास्त धोकादायक ठरू शकतो. दरवर्षी सुपरबगच्या संसर्गाने ७० लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. अन्य सेक्शुअल ट्रांसमिटेड डिसीजच्या तुलनेत सुपरबग जास्त धोकादायक आहे. या संसर्गाची लक्षणे लगेच लक्षात येत नाही त्यामुळेही हा रोग जास्त धोकादायक ठरतो. महिलांमध्ये वांझोटेपणा येण्याचं हे महत्वाचं कारण ठरतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT