आरोग्य

Health: झोपताच मनात विचार येतात; 10 मिनिट करा Walking Meditation

सध्याची जीवनशैली पाहता गरजेपेक्षा जास्त विचार, चिंता या गोष्टी प्रत्येकांमध्ये आढळून येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

रात्री झोपण्यासाठी म्हणून बिछान्यावर पडलं की लगेच मनात विचारांच चक्र फिरु लागतं. पुढच्या काळात आपल्यावर हे संकट तर नाही ना येणार? असे अनेक विचार मनात रेंगाळू लागतात. मनातले विचार संपतच नाहीत. एकापाठोपाठ एक विचार येतच राहातात. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही. या गोष्टीला अनेकजण बळी पडतात. काय करावे काहीच सुचत नाही. मग त्यासाठी आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत.

मनुष्याने आजवरची प्रगती ही विचारांच्या जोरावर प्रगती केली आहे. पण सध्याची जीवनशैली पाहता गरजेपेक्षा जास्त विचार, चिंता या गोष्टी प्रत्येकांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे बहुतांश विचार टोकाचे आणि नकारात्मक येतात. हाच विचार मनुष्याच्या आरोग्याला घातक ठरतो. सतत थकवा आल्यासारखं वाटतं. गळून गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी झोपण्यापूर्वी वॉकिंग मेडिटेशन हा उपाय महत्त्वाचा ठरतो.

झोपण्यापूर्वी वॉकिंग मेडिटेशनसाठी तुम्ही तुमच्या घराभोवती एक शांत जागा निवडा.

त्यानंतर 10 मिनिट स्थिर गतीने चाला.

चालताना तुमच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या.

आजूबाजूचा आवाज टाळण्यासाठी तुम्ही शांत गाणी ऐकू शकता.

त्यानंतर झोपण्यापूर्वी ध्यानधारणा करा. ध्यानधारणा केल्याने मानसिक व शारीरिक शांतता प्राप्त होते. आपल्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२व्या वर्षी हरवलेला मुलगा २५व्या वर्षी परतला; गावात गेला तर घर नव्हते, पण आई दिसली… नंतर जे घडलं ते शब्दांच्या पलीकडचं

Maharashtra Election Update : राज्यातील राजकारण ढवळून निघणार! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कधीही होणार जाहीर? महत्त्वाची अपडेट समोर...

Viral Video : सीमेवर ड्युटी करताना स्वत:चाच वाढदिवस विसरला फौजी, मुलीने व्हिडिओ कॉल केला अन्... व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखोंची मनं

PCMC Election : भाजपकडून दादा लक्ष्य! पिंपरीतील कारभारावरून बावनकुळे यांचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT