Menopause Care  google
आरोग्य

Menopause Care : रजोनिवृत्तीचा काळ सोपा करण्यासाठी रुजुता दिवेकरच्या टीप्स

स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या संदर्भात बरेच सल्ले दिले जातात. या दरम्यान हार्मोनल बॅलन्ससाठी व्यायाम केला पाहिजे, ते योग्य आहे,

नमिता धुरी

मुंबई : रजोनिवृत्तीच्या काळात कोणत्याही महिलेच्या शरीरात अनेक बदल होत असतात. ४५-५० वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती दिसून येते. काही काळापूर्वी स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागतात.

या काळात महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. या हार्मोनल बदलांमुळे अनेक महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. (tips from Dietitian rujuta diwekar for menopause health care )

डायटीशियन रुजुता दिवेकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. रजोनिवृत्तीचा कठीण टप्पा सोपा करण्यासाठी कोणत्या टिप्स पाळल्या पाहिजेत हे त्यांनी सांगितले आहे. हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रजोनिवृत्तीची लक्षणे

अनियमित मासिक पाळी

योनीचा कोरडेपणा

मूड स्विंग होणे

वजन वाढणे

डोकेदुखी

चयापचय मंदावणे

झोपेच्या पद्धतींमध्ये बदल

या टिप्स फॉलो करा

  • जास्त व्यायाम करू नका

स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या संदर्भात बरेच सल्ले दिले जातात. या दरम्यान हार्मोनल बॅलन्ससाठी व्यायाम केला पाहिजे, ते योग्य आहे, परंतु जास्त व्यायाम करून शरीराला थकवू नका.

जर तुम्ही इतका व्यायाम करत असाल की तुम्हाला ४८ तास थकवा जाणवत असेल किंवा शरीर दुखत असेल, तर तुम्ही खरंच जास्त व्यायाम करत आहात. व्यायामाची दिनचर्या पाळा पण एकाच वेळी जास्त व्यायाम करू नका.

  • लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका

रजोनिवृत्ती हा एक स्त्रीसाठी केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कठीण असतो. वजन वाढणे, वयाचा टप्पा गाठणे, त्वचेत होणारे बदल आणि अशा अनेक गोष्टींचा महिला ताण घेऊ लागतात. अशा वेळी कोण काय म्हणतो याकडे लक्ष देऊ नका.

  • आहाराची काळजी घ्या

रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोनल बदलांमुळे आपल्या आहारावरही परिणाम होतो. या काळात महिला अनेकदा खाण्यापिण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत, जे पूर्णपणे चुकीचे आहे. रजोनिवृत्ती दरम्यान योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे.

आहार हे खरे तर आपल्या शरीराचे इंधन आहे, जे शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून निरोगी आहार घ्या. जेव्हा आपण अन्न नीट खात नाही, तेव्हा आपले शरीर कोणतेही बदल स्वीकारू शकत नाही, अशा स्थितीत रजोनिवृत्तीतील बदलांना सामोरे जाणे अधिक कठीण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT