थोडक्यात:
टूथपेस्ट, बाम आणि केसांचं तेल यामध्ये मेंदूला उत्तेजित करणारे रासायनिक घटक असू शकतात.
ही रसायनं त्वचेद्वारे शोषली जाऊन न्यूरॉन्सवर विपरीत परिणाम करतात.
सतत वापरामुळे मायग्रेन, अपस्मार, चिंता यांसारख्या मेंदूविकारांचा धोका वाढतो.
Expert Opinion on Mental Health Risks from Daily-Use Products: टूथपेस्ट, बाम आणि केसांना लावले जाणारे तेल या वस्तू सर्वसामान्यपणे वापरल्या जातात. परंतु यात मेंदूला उत्तेजित करणारे काही घटक असतात. सततच्या वापरामुळे कालांतराने मेंदूरोगाच्या लक्षणांचे कारण ठरू शकते, असा इशारा मेंदूरोग तज्ज्ञांकडून देण्यात आला.
बऱ्याच कंपन्यांचे टूथपेस्ट, केसांचे तेल आणि बाम यांसारख्या उत्पादनांमध्ये मेंदूला उत्तेजित करणारे घटक असतात. हे अपायकारक घटक संवेदनशील त्वचेद्वारे शोषले जातात. या रासायनिक प्रक्रियेद्वारे मेंदूतील न्यूरॉन्स वारंवार एखाद्या उत्तेजनाच्या संपर्कात येतात. ज्यामुळे मेंदूच्या विविध क्षेत्रांत अतिउत्साह, न्यूरॉन्स, सर्किट आणि नेटवर्क तयार होते. त्यामुळे मायग्रेन, अपस्मार यांसारख्या विकारांचा धोका असतो, अशी माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त व पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
प्राथमिक अभ्यासात काही घटकांच्या संपर्कामुळे मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, चक्कर किंवा व्हर्टिगो, शरीराच्या एका बाजूला वेदना, अपस्मार, चिंता, पॅनिक अटॅक, सायकोसिस आणि नैराश्य यांसारख्या आजारांशी संबंध असल्याचे दिसून आल्याचेही डॉ. मेश्राम यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले.
रुग्णांवर उपचारादरम्यान डॉक्टरांना टूथपेस्टचा वापर थांबवून अथवा टूथपेस्टची कंपनी बदलून रुग्णांना लक्षणांपासून आराम होत असल्याचेही मेंदूरोग तज्ज्ञांकडून निरीक्षण नोंदविले जाते. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय शोध प्रबंधानुसार एका प्रकरणात टूथपेस्टच्या वापराशी संबंधित क्लस्टर डोकेदुखीचा अहवाल दिला गेला. त्यात टूथपेस्टचा वापर थांबवल्यावर दोन आठवड्याच्या आत रुग्ण बरा झाला. मायग्रेनच्या रुग्णांनी टूथपेस्टचा वापर बंद केल्याने डोकेदुखीच्या लक्षणात घट झाल्याचे समजले.
टूथपेस्टला पाणी किंवा मिठाच्या पाण्यासारख्या पर्यायांनी बदलल्याने मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी आणि चिंता यांसारख्या न्यूरोसायकियाट्रिक स्थितींचा भार कमी होऊ शकतो, असे डॉ. मॅथ्यू यांनी सांगितले.
टूथपेस्ट, बाम आणि केसांचं तेल मेंदूवर परिणाम करू शकतं का? (Can toothpaste, balm, and hair oil affect the brain?)
- होय. काही टूथपेस्ट, बाम आणि केसांच्या तेलांमध्ये मेंदूला उत्तेजित करणारे रसायनांचे घटक असतात. हे घटक त्वचेद्वारे शोषले जाऊन न्यूरॉन्सवर परिणाम करतात, ज्यामुळे डोकेदुखी, अपस्मार, चिंता यांसारखे मेंदूविकार उद्भवू शकतात.
मेंदूविकारांशी टूथपेस्टचा काय संबंध आहे? (What is the connection between toothpaste and neurological disorders?)
- प्राथमिक अभ्यासांमध्ये आढळले की काही रुग्णांना टूथपेस्टचा वापर बंद केल्यावर मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो. टूथपेस्टमधील काही रसायने मेंदूतील न्यूरॉन्सवर विपरीत परिणाम करू शकतात.
टूथपेस्टऐवजी कोणते पर्याय वापरू शकतो? (What are the alternatives to toothpaste?)
- डॉक्टरांच्या मते, मिठाचे पाणी किंवा साधं पाणी हे सुरक्षित पर्याय ठरू शकतात. यामुळे न्यूरोसायकियाट्रिक लक्षणांमध्ये घट होण्याची शक्यता आहे
या समस्यांचा धोका कोणत्या व्यक्तींना अधिक असतो? (Who is more at risk of these neurological issues?)
- ज्यांना मायग्रेन, अपस्मार, चिंता, डोकेदुखी, चक्कर किंवा मानसिक तणावाचा त्रास आहे, त्यांना अशा उत्पादनांमधील रसायनांचा जास्त धोका असतो. त्वचा संवेदनशील असलेल्या व्यक्तींनाही अधिक परिणाम होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.