Hearing Disease esakal
आरोग्य

Hearing Disease: बहिरेपणाचेही असतात 5 प्रकार; कादर खान यांना उद्भवलेला त्रास तुम्हाला तर होत नाहीये?

कादर खान यांनाही ऐकू न येण्याचा त्रास होता. तुम्हालाही तर असाच त्रास नाही. जाणून घेऊया सविस्तर

सकाळ ऑनलाईन टीम

Hearing Disease: तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीची ऐकण्याची क्षमता वेगळी असू शकते. कोणाला अगदी कमी आवाजातलंही ऐकू जातं तर कोणाला मोठ्याने बोलल्याशिवाय ऐकूच जा नाही. लोकांना खळखळून हसरवणारे दिग्गज कलाकार कादर खान यांनाही ऐकू न येण्याचा त्रास होता. तुम्हालाही तर असाच त्रास नाही. जाणून घेऊया सविस्तर.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या मते, जगभऱ्यात जवळपास दीड अब्ज लोकांना ऐकू न येण्याच्या समस्या दिसून आल्यात. यामागे गोंधळ. जुने आजार, वाढते वय आणि जेनेटिक रिजन अशी बरीच कारणं असू शकतात. यावर वेळेत उपचार झाले नाहीत तर तुमच्या समस्या वाढू शकतात. आज आपण बधिरत्व येण्याचे पाच प्रकार कोणते ते जाणून घेऊया.

१. सेंसोरीन्यूरल हियरिंग लॉस ही सगळ्यात कॉमन समस्या आहे. हा त्रास तेव्हा उद्भवतो जेव्हा तुमच्या कानातील आतील नर्वला इजा होते. जेव्हा कोक्लियाच्या केसांच्या पेशींना काही प्रकारचा आघात होतो तेव्हा हा त्रास उद्भवतो.

२. सडन सेंसोरीन्यूरल हियरिंग लॉस हा तुम्हाला अचानक उद्भवतो. अशा वेळी तुम्ही लगेच ईयर स्पेशालिस्टला संपर्क करायला हवा. या काळात जर तुम्ही उपचार केले नाहीत तर हा त्रास तुम्हाला आयुष्यभऱ्यासाठी सहन करायला लागू शकतो.

३. कंडक्टिव्ह हियरिंग लॉस मध्ये साउंड वेव्ज तुमच्या कानाच्या आतील पडद्यापर्यंत पोहोचू शकत नाही. असे तेव्हा होते जेव्हा तुमच्या इयर कॅनलमध्ये अडथळे येतात. यावर वेळेत उपचार करायला हवा.

४. मिक्स्ड हियरिंग लॉस मध्ये व्यक्तीस कंडक्टिव्ह किंवा सेंसोरीन्यूरल अशा दोन्ही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या या त्रासावर उपचार करण्यासाठी आदी तुमची हियरिंग टेस्ट केली जाते. कानाची मशीन यावेळी तुमच्या उपयोगात येते. (Health News)

५. प्रेसबायक्यूसिस (Presbycusis) ला वयानुसार वाढणारा बहिरेपणा असेही म्हटले जाते. वाढत्या वयामुळे तुम्हाला हा त्रास उद्भवू शकतो. या त्रासात तुमचे दोन्ही कान एकावेळी प्रभावित होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT