Arogya Mantra esakal
आरोग्य

Arogya Mantra : पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर आरोग्यदायी, वाचा फायदे

पाणी पिण्यासाठी फार कमी लोक तांब्याच्या भांड्यांचा वापर करतात, याचे फायदे फार आहेत

सकाळ ऑनलाईन टीम

Copper Utensils Using Benefits : प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी साठवू नये किंवा साठवलेले पाणी पिऊ नये. प्लास्टिकमधील रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. त्याऐवजी तांब्याच्या भांड्याचा पाणी पिण्यासाठी वापर करावा.

प्लास्टिकमध्ये पॅथेलेटस नावाचे रसायन असते त्यामुळे यकृताचा कर्करोग आणि शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

फ्रेडोनिया येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कने नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे आढळले की, बाटलीबंद पाण्यात, मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण जास्त असते. अनेक घरांमध्ये फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवले जाते. यातील डीपीए आणि अन्य केमिकल्स शरीरात जातात. त्यापेक्षा तुम्ही तांब्याच्या भांड्यांचा वापर करा. पूर्वी लोक तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा वापर करायचे. आर्यर्वेदानुसार, तांबे हे शरीरासाठी अतिशय पोषक असते. त्यामुळे लोकांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलेच पाणी प्यावे. मात्र तांब्याचे भांडे फ्रीजमध्ये ठेऊ नये.

प्लास्टिकमध्ये असलेले केमिकल्स केवळ पाणी दूषित करत नाहीत तर ते आरोग्यासही हानिकारक आहे. या व्यतिरिक्त, प्लास्टिक फ्लोराइड, आर्सेनिक आणि अॅल्युमिनियमसारखे पदार्थही बाहेर सोडते. हे पदार्थ शरीरासाठी विषारी असतात. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी स्लो पॉइझन आहे. प्लास्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते. उन्हात ठेवलेल्या प्लास्टिक बाटलीतील पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकते. कारण सूर्यकिरणांमुळे बीपीए रसायन पाण्यात तातडीने मिसळले जाते. त्यामुळे पाण्याची प्लास्टिक बाटली वापरणार असाल, तर ती सावलीत ठेवावी.

- डॉ. शिल्पा पळसकर-पांडे

प्लास्टिकच्या बाटलीने पाणी पिल्याने नेमके काय होते?

बीपीए निर्मितीः बायफेनिल ए सारखे रसायन ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, प्रजनन समस्या आणि मुलींमध्ये लवकर यौवन यासारख्या आरोग्यासंबंधीच्या समस्या उद्भवू शकतात.

डायऑक्सिनः सूर्याच्या थेट संपर्कात आल्याने, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून रासायनिक लींचिंग होऊ शकते आणि डायऑक्सिनसारखी हानिकारक रसायने बाहेर पडू शकतात. ज्यामुळे स्तन कर्करोगाचा धोका वाढतो. (Health)

हृदयविकाराचा धोका: मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो. रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. बाटलीमुळे पाण्यात मिसळलेले रसायन शरीराला आतून कमकुवत बनवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT