Running sakal
आरोग्य

हेल्थवेल्थ : थंडीत धावताना...

थंडीत खूप लोक धावण्यास प्रारंभ करतात. ते आरोग्यासाठी योग्यही आहे. मात्र, त्यासोबतच काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्‍यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

थंडीत खूप लोक धावण्यास प्रारंभ करतात. ते आरोग्यासाठी योग्यही आहे. मात्र, त्यासोबतच काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्‍यक आहे. थंड हवामानात धावताना शरीरात विविध बदल होतात. रक्तवाहिन्या अधिक घट्ट होतात. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. अनेकांना थंड हवेत श्वास घेण्याचा त्रास होतो. त्यामुळे दमा असल्यास विशेष काळजी घ्यावी.

थंडीत घ्यावयाची काळजी

१) हायपोथर्मिया : अति थंड हवामानात तुम्ही धावत असाल, तर त्याचा विपरित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्याला हिमबाधा असे म्हणतात. त्यासाठी उबदार कपड्यांबरोबरच हातापायांची बोटे, कान, तोंड उघडे पडणार नाही, याची काळजी घ्या.

२) पाण्याचे प्रमाण : थंडीत शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, तुम्हाला तहान लागली नाही याचा अर्थ शरीराला पाण्याची गरज नाही असा नसतो. त्यामुळे पाणी कमी होऊ नये म्हणून अधूनमधून थोडे थोडे पाणी पीत राहा.

३) धुके व निसरडा पृष्ठभाग : धुके असल्यास समोरचे नीट दिसत नाही. त्यामुळे धावण्यासाठी अंधारात घराबाहेर पडू नका. धुके थोडे कमी होऊ द्या. स्वतःसोबत बॅटरी ठेवा. पायात टिकाऊ बूट घाला. हिवाळ्याच्या पहाटे दवबिंदूंमुळे रस्ते निसरडे झालेले असू शकतात. त्यामुळे योग्य ती काळजी घ्या.

अशी करा तयारी

१) उबदार कपडे : शरीर उबदार ठेवू शकणाऱ्या कपड्यांची निवड करा. त्यासाठी केवळ फॅशनचा विचार न करता आरोग्याचा विचार करा. लोकरीचे कपडे अधिक ऊब निर्माण करू शकतात.

२) वॉर्म अप : धावण्याआधी जागीच उड्या मारणे, हात-पाय चक्राकार फिरवणे, स्ट्रेचिंग करणे अशा विविध उपायांद्वारे वॉर्म अप करा. यामुळे तुमचे शरीर मोकळे होईल आणि त्यात उष्णता निर्माण होईल.

३) सूर्यापासून संरक्षण : थंडीतही सूर्यकिरणे प्रखर असू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उंच टेकडीवर धावताना सूर्याच्या प्रखर किरणांपासून स्वतःचे संरक्षण करा. त्यासाठी गरज भासल्यास गॉगल किंवा सनक्रीमचा वापर करा.

४) मानेचे संरक्षण : थंडीपासून शरीराचे संरक्षण करताना बऱ्याचदा मानेकडे दुर्लक्ष होते. मात्र, असे करू नका. स्कार्फ किंवा हाय कॉलर जॅकेटच्या साह्याने मान झाका. मान उघडी राहिल्यास सर्दीचा त्रास होऊ शकतो.

धावण्याचे फायदे

१) कॅलरी नष्ट होतात : थंडीत धावताना तुमचे शरीर त्याचे मूळ तापमान स्थिर ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करते. याचाच अर्थ असा की, अधिक ऊर्जा खर्च होऊन अतिरिक्त कॅलरी नष्ट होतात. त्यामुळे स्थूलपणा कमी होतो. चयापचय व्यवस्थित होते.

२) हृदयाचे आरोग्य : थंड हवामानात हृदयाला नियमित रक्तपुरवठा व्हावा यासाठी शरीर प्रयत्नशील असते. धावताना हृदयाचे ठोके वाढतात. ते अधिक गतीने कार्य करू लागते. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.

३) मानसिक आरोग्य : धावताना मन विचलित होत नाही. एकाग्रता साधण्यास मदत होते. सकाळच्या प्रसन्नतेमुळे दिवस चांगला जातो. दिवसभर ती ऊर्जा पुरते.

४) प्रतिकारशक्ती वाढते : कडाक्याच्या थंडीत रोज धावल्याने शरीराची सहनशक्ती वाढते. स्नायू, नसा मोकळ्या होतात. शरीर व्यायामासाठी तयार होते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि विविध रोग जडण्याचा धोकाही कमी होतो.

५) व्हिटॅमिन डी : हिवाळ्यात बरेच लोक घराबाहेर पडतच नाही. त्यामुळे सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नाही आणि व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते. हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन डी गरजेचे आहे. त्यामुळे धावताना सूर्यकिरणांपासून व्हिटॅमिन डीदेखील शरीराला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest: 5 वर्षांपासून पुण्यात राहून PSI होण्याचं स्वप्न... बाप शेतमजुरी करून पैसे पाठवतो, पण आयोग? विद्यार्थ्यांनी काय सांगितलं?

Savitribai Phule Jayanti: संघर्षातून घडलेली क्रांती! सावित्रीबाई फुलेंचे 10 विचार बदलतील तुमचं विचारविश्व

Gemini Horoscope : यशासाठी झगडल्याशिवाय पर्याय नाही, नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल, पण..; मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल नवीन वर्ष?

Uddhav Thackeray : दोन गुजरात्यांच्या हाती मुंबई द्यायची नाही

Prayagraj Magh Mela 2026: आजपासून माघ मेला सुरू, एका क्लिकवर पाहा संगम स्नानाच्या सर्व पवित्र तारखा

SCROLL FOR NEXT