Water Drinking Habit esakal
आरोग्य

Water Drinking Habit : अशा पद्धतीने पाणी प्या, 21 दिवसात गॅस, अ‍ॅसिडीटी होईल गायब

आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्या निम्म्या समस्या सुटू शकतात.

धनश्री भावसार-बगाडे

Correct Water Drinking To Cure Stomach Problems : आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळेच आपल्या बहुतांश संमस्या निर्माण झाल्याचे दिसून येते. वाढता ताण आणि स्वतःकडे दुर्लक्ष यामुळेच शारीरिक आणि मानसिक समस्या वाढलेल्या दिसतात. पण आपण रोजच्या सवयींमध्ये काही थोडेफार योग्य बदल केले तर आपल्याला कमी काळात खूप चांगले बदल दिसतात.

यातलीच एक सवय म्हणजे पाणी पिण्याची आहे. आपल्या शरीराचा बहुतांश भाग हा पाणी असल्याचं आपण जाणतो. त्यामुळे योग्य पद्धतीने पाणी पिणे खूप महत्वाचे असते. ते कसे जाणून घेऊया.

Water Drinking Habit

जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर ताण येतो तर कमी पाणी प्यायल्याने शरीर डीहायड्रेट होते. पण जर २१ दिवस योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर शरीरासंबंधी अनेक समस्या दूर होतात. NCBI ने केलेल्या अभ्यासानुसार योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने अनेक समस्या दूर होतात.

सावकाश पाणी प्या

पाणी कसे पितात यावर बरेच काही अवलंबून असते. जर तुम्ही एका झटक्यात ग्लासभर पाणी पित असाल तर ते योग्य नाही. यामुळे पाण्याचा इंटेक अचानक वाढेल आणि त्याचा ताण किडनीवर येईल. त्यामुळे किडनीला हानी पोहचू शकते. पुरुषांना दिवसातून ३-४ लीटर तर महिलांना २-३ लीटर पाण्याची गरज गरज असते. वर्क आऊट करणाऱ्यासाठी अर्धा लीटर जास्त.

Water Drinking Habit

एकदम पाणी पिऊ नये

तहान लागली की, एकदम ग्लासभर किंवा बाटली तोंडाला लावून पाणी पितात. ४-५ सेकंदात तर पाणी पिऊन संपवतात. पण असं अजिबात करू नका. थोड्या थोड्या वेळात घोट घोट पाणी पित रहा. पाण्याच्या घोट तोंडात घेतल्यावर काही सेकंद तो तोंडात फिरायला हवा. त्यामुळे तोंडातली लाळही पाण्यासह पोटात जाते आणि पचन क्रियेस मदत करते.

पाणी पिण्याच्या वेळा पाळा

पाणी कधी प्यावे आणि कधी नाही हे ध्यानात ठेवायला हवे. बऱ्याचदा जेवणाआधी तासभर आणि नंतर तासभर पाणी पिऊ नये असे सांगतात. जेवणाआधी जठराग्नी तयार होतो आणि पाचनरस बनवतो. पण पाणी प्यायल्याने तो पाचनरस पातळ होतो. त्यामुळे अन्न पचन नीट होत नाही. पोटात अन्न सडते आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात.

Water Drinking Habit

पिण्याच्या पाण्याचं तापमान

फार गार किंवा फार गरम पाणी पिऊ नये. पाण्याच्या तापमानातील बदल आरोग्यासाठी हानिकारक असतात. पण वातावरणानुसार शरीराचे तापमान नियंत्रीत करण्यासाठी उन्हाळ्यात माठातील तर हिवाळ्यात कोमट पाणी पिऊ शकतात असं तज्ज्ञ सांगतात.

उभ्याने पाणी पिऊ नये

उभ्याने पाणी पिल्याने थेट किडनीवर त्याचा ताण येतो. त्यामुळे उभ्याने पाणी पिऊ नये.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Number Plates: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याकडे पुणेकरांचं दुर्लक्ष; फक्त 'एवढ्या' वाहनांवरच प्लेट्स

Latest Maharashtra News Updates Live : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले

HSRP नंबर प्लेट बसवणं आता आणखी सोपं! किती रुपये खर्च? कधी मिळणार? कशी करणार नोंदणी? जाणून घ्या डिटेल्स

Nitesh Rane: मत्स्योत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ, मंत्री नितेश राणेंच्या कार्यामुळे महाराष्ट्राची भरारी

Chandrapur News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने एस.टी. महामंडळाची बस १० फूट खोल खड्ड्यात कोसळली, वाहकांचा मृत्यू; तर १८ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT