Hormonal Changes esakal
आरोग्य

Hormonal Changes : काही केल्या वजन कमी होत नाहीये? हे 4 हार्मोन्स जबाबदार...

तुम्ही कधी विचार केलाय का? वजन वाढण्यामागे तुमचे हार्मोन्सही जबाबदार असू शकतात

साक्षी राऊत

Hormonal Changes : वाढलेलं वजन घटवण्यासाठी लोक वेगवेगळ्या हेल्थ रूटीनचा त्यांच्या डेली लाइफमध्ये समावेश करून घेतात. काही लोक तासंतास एक्सरसाइझ करतात तर काही लोक सकाळी लवकर उठून वॉक किंवा रनिंगला जातात. मात्र एवढे कष्ट घेऊनही वजन कमी झाले नाही तर हाती येते ती फक्त निराशा. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का? वजन वाढण्यामागे तुमचे हार्मोन्सही जबाबदार असू शकतात.

महिलांमध्ये वजन वाढण्याचे मुख्य कारण हार्मोनल चेंजेंस असू शकते. प्रेग्नेंसी, मेनॉपॉज आणि डिप्रेशनचा थेट प्रभाव महिलांच्या मेटाबोलिझमवर होतो. ज्यामुळे वजन वाढते. त्यामुळे हार्मोन्स संतुलित करणे गरजेचे आहे. जेणेकरून वजन कमी करण्यास मदत होईल. चला तर आज आपण कोणत्या हार्मोन्समुळे वजन वाढते ते जाणून घेऊया.

१) इंसुलिन

इंसुलिन हार्मोनचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोज शरीराच्या पेशींमध्ये पोहोचवणे. हे ग्लुकोज शरीर ऊर्जा म्हणून वापरते. रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढल्यास वजन वाढते. शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढल्याने मधुमेहासारखा आजार होतो, असे अनेक संशोधनांतून समोर आले आहे.

२) एस्ट्रोजेन

एस्ट्रोजेन हा महिलांमधील सेक्स हार्मोन असतो. जेव्हा स्त्रियांना मेनॉपॉजमध्ये समस्या येतात तेव्हा शरीरातील एस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे वजन वाढते. एस्ट्रोजेनची पातळी वाढल्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे महिलांना फुगल्यासारखे वाटते.

३) टेस्टोस्टेरॉन

जीवनशैली आणि आहारातील बदलांमुळे आजकाल महिलांमध्ये PCOS नावाची हार्मोनल समस्या सामान्य झाली आहे. या हार्मोनमुळे शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे वजन वाढणे, मासिक पाळी येणे, चेहऱ्यावरील केस आणि वंध्यत्वाची समस्या उद्भवते. टेस्टोस्टेरॉनमुळे पोट आणि हिप्सच्या आजूबाजूचा भाग वाढायला लागतो.

4. थायरॉईड

थायरॉईड हार्मोन मानेमध्ये तयार होतो. हा हार्मोन शरीरात योग्य चयापचय राखण्यास मदत करतो. ज्या महिलांच्या शरीरात थायरॉईड हार्मोनचे संतुलन नसते, त्यांच्यामध्ये वजन वाढणे आणि लठ्ठपणाची समस्या दिसून येते. तसेच त्यामुळे थकवा येणे, वीकनेस यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. (Health)

नोट : जर कोणत्याही कारणाशिवाय तुमचे वजन वाढत असेल आणि डाएटिंग, व्यायाम यासारख्या गोष्टींनीही ते कमी होत नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT