weight loss tips 
आरोग्य

वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी 'या' 4 देशी पेयांचा आहारात करा समावेश

अशा काही देशी पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या पेयांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक घटक असतात जे शरीराला तंदुरुस्त ठेवतात. यामध्ये मसाले, ड्रायफ्रुट्स अशा काही महत्वाच्या घटकांचा समावेश असतो. यांच्या वापरामुळे तुम्ही तुमचे आरोग्य रोगविरहीत ठेवू शकता. हळद, लवंग, दालचिनी यांचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर राहतात. चयापचय सुधारते आणि शरीरही डिटॉक्सिफाय होते. अशा काही देशी पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या पेयांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. जे पिल्याने तुमचे वजन सहजपणे कमी करू शकता आणि पोटावरील चरबीही कमी करु शकता.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर पेय

सब्जा बी आणि लिंबू पाणी

एका संशोधनानुसार, ग्लासभर पाण्यात एक चमचा सब्जा बी आणि लिंबाचा रस मिसळून पिल्याने शरीराला फायदा होता. या मिश्रणात एक चमचा मध टाकून तासाभरानंतर सब्जा बीया पाण्यावर आल्यानंतर ते गाळून घ्या. यानंतर या बियांमध्ये लिंबाचा रस मिसळा आणि ते एकत्र हलवून घ्या. रोज सकाळी रिकाम्या पोटी हे पेय पिल्याने वजन कमी होण्यास फायदा होऊ शकता.

जिरे पाणी

भूक कमी करण्याच्या आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी काम करते. जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी एका ग्लास पाण्यात एक चमचे जिरे टाका आणि रात्रभर ते त्या पाण्यात सोडून तसेच भिजू द्या. यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी पिऊन टाका.

एका जातीची बडीशेप पाणी

एका जातीची बडीशेप पाणी वजन कमी करू शकते. यासाठी एका ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप टाका आणि नंतर सकाळी गाळून प्या. हे पोटाची चरबी लवकर कमी करण्याचे काम करते.

ओव्याचे पाणी

वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर ठरू शकते. यासाठी ओवा भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी याचे पाणी गाळून प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT