Weight Loss Evening Walk esakal
आरोग्य

Weight Loss Evening Walk : महिन्याभरात स्लीमट्रीम दिसायचंय? असा करा इव्हिनिंग वॉक

ज्यांना सकाळी वॉकसाठी वेळ मिळत नाही ते लोक संध्याकाळी वॉक करतात.

धनश्री भावसार-बगाडे

Weight Loss Tips For Evening Walks : बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वॉक करतात. चालणे हा कधीही उत्तम व्यायाम आहे. चालण्यासाठी बहुतेकदा लोक सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडतात. ज्यांना सकाळी शक्य होत नाही ते लोक संध्याकाळी वॉक करतात. संध्याकाळी वॉक करूनही तुम्ही चांगल्या प्रकारे वजन कमी करू शकतात. त्यासाठी फक्त काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

चालण्याचे फायदे

अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी चालणे फार आवश्यक असते. संध्याकाळचा व्यायाम हा बॉडी मसल्स बनवण्यासाठी फार चांगला समजला जातो. यावेळी तुम्ही कामं संपवून स्ट्रेस फ्री होऊन वॉक एन्जॉय करू शकतात. शिवाय यामुळे एनर्जी लेव्हल चांगली राहते. मेटाबोलिझम सुधारते. अवाजवी खाणे कमी होऊन वजन कमी होते.

इव्हिनिंग वॉक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • जर तुम्हाला इव्हिनिंग वॉकने वजन कमी करायचे असेल तर एका ठराविक वेळेपर्यंत वॉक करणे गरजेचे आहे. यासाठी सुरुवात तुम्ही अर्ध्या तासापासून करू शकतात.

  • चालताना सुरुवातीला काही मिनीटं तुमचा स्पीड स्लो असावा. एकदा बॉडी वॉर्मअप झाल्यावर हळू हळू चालण्याचा वेग वाढवावा. त्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.

  • वजन कमी करायचं असेल तर फीटनेस गोल असायला हवा. दर आठवड्याला वजन करून चेक करावे, म्हणजे उत्साह वाढतो.

  • वजन वेगात कमी करण्यासाठी चालण्याचा वेळ १ तासापर्यंत न्यावा सुरुवातीला हे कठीण वाटेल पण एकदा सवय झाली की शक्य होईल.

  • चालताना जर थकवा जाणवत असेल तर लगेच बसून घ्यावे. १-२ घोट पाणी प्यावे. यामुळे शरीरावरचा ताण कमी होण्यास मदत होईल.

  • वॉक सुरु करण्याआधी वॉर्मअप करा. कपडे आणि बूट कंफर्टेबल निवडा. त्यामुळे तुम्ही बराचवेळ वॉकिंग करू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT