Weight Loss Tips Sakal
आरोग्य

Juices For Weight Loss वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, घरच्या घरी तयार करा हे 4 ज्युस

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात का? तर मग जाणून घ्या ही महत्त्वपूर्ण माहिती…

Harshada Shirsekar

लठ्ठपणा म्हणजे कित्येक गंभीर आजारांना आयते निमंत्रण. म्हणूनच वाढलेले वजन नियंत्रणात आणण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. पण डाएट व वर्कआऊटचे रूटीन कितीही काटेकोरपणे फॉलो केले तरीही शरीराचे वजन नियंत्रणात येत नाही, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. 

पण आहारामध्ये काही पौष्टिक बदल केल्यास नक्कीच मदत मिळू शकते.  डाएटमध्ये काही प्रकारच्या ज्युसचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात येऊ शकते. पण केवळ ज्युसवर अवलंबून न राहता याव्यतिरिक्त नियमित व्यायाम करणे आणि डाएट फॉलो करणंही तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया बेली फॅट कमी करण्यास उपयुक्त ठरतील अशा ज्युसची माहिती…

अननस ज्युस 

वजन कमी करण्यासाठी आपण डाएटमध्ये अननसाच्या रसचा समावेश करू शकतो.  अननसातील औषधी गुणधर्मांमुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. शिवाय यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता देखील सुधारते.

चयापचयाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत असल्यास शरीरातील विषारी घटक देखील सहजरित्या बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण डाएटमध्ये अननसाच्या रसाचा समावेश करू शकता. 

आले आणि लिंबाचा रस 

आले व लिंबाचा रस वेटलॉससाठी उपयुक्त ठरू शकता. आल्यातील काही पोषकघटकांमुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक व अतिरिक्त चरबी यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. तर दुसरीकडे लिंबूमध्ये पॉलीफेनोल्स घटकामुळे शरीरात जमा होणारी चरबीचे प्रमाण नियंत्रणात येते आणि वजन घटण्यासही मदत मिळते. शिवाय लिंबू पाणी हे डिटॉक्स ड्रिंक म्हणून फिटनेसप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेच. 

मेथीचे पाणी

वेट लॉस ड्रिंकमध्ये मेथीच्या पाण्याचा आपण समावेश करू शकता. शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाणी प्यायल्यास मदत मिळू शकते. मेथी दाण्यामध्ये शरीरातील इन्सुलिन पातळी नियंत्रणात ठेवण्यासह लिपिड, कोलेस्ट्रॉल आणि चरबी कमी करण्यास उपयुक्त असणाऱ्या पोषक घटकांचा समावेश आहे. शिवाय मेथींमध्ये फायबरचेही प्रमाण अधिक असते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT