weight Loss Tips esakal
आरोग्य

Weight Loss Tips : व्यायाम न करताच वजन कमी करायचेय? मग, आजपासूनच 'या' गोष्टी करा

weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट खूप महत्वाचा आहे, यात काही शंका नाही.

Monika Lonkar –Kumbhar

weight Loss Tips : सध्याचे धावपळीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. मागील काही वर्षांपासून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी मग विविध गोष्टींची मदत घेतली जाते.

वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट खूप महत्वाचा आहे, यात काही शंका नाही. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की, व्यायामाशिवायही तुम्ही वजन कमी करू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला आहार आणि जीवनशैलीशी संबंधित काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

साखरेचे सेवन कमी करा

गोड खायला तर सगळ्यांनाच आवडते. परंतु, जास्त गोड पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेहासोबतच, लठ्ठपणा आणि इतर आजारांना आमंत्रण मिळू शकते. साखरेमुळे वजन वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या आहारातून साखर हद्दपार करा किंवा हे शक्य नसेल तर साखरेचे सेवन कमी करा. यामुळे, फॅट बर्न करण्यास मदत होईल आणि तुमचे वजन कमी होऊ शकेल.

जास्त ताण घेऊ नका

जास्त ताण घेतल्याने याचा परिणाम वजनावर होऊ शकतो. हे अगदी खरे आहे. वाढत्या वजनात तणावाचाही मोठा वाटा आहे. ताण घेतल्याने शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते आणि याचा परिणाम वजनावर होतो. तसेच, कोणत्याही कामात रस नसल्यामुळे व्यक्ती जास्त प्रमाणात अन्नाचे सेवन करते. त्यामुळे, वजन आपोआप वाढते. त्यामुळे, चिंता, तणाव आणि नैराश्य यापासून शक्यतो दूर राहा.

स्नॅक्समध्ये पौष्टिक पदार्थ खा

स्नॅक्समध्ये आजकाल विविध प्रकारच्या गोष्टींचा समावेश झाला आहे. यामध्ये काही हेल्दी असतात तर काही अनहेल्दी असतात. त्यामुळे, स्नॅक्स समजून अनहेल्दी गोष्टी खाऊ नका. कारण, यामुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका असतो.

जर तुम्ही स्नॅक्समध्ये बिस्किटे, चिप्स किंवा इतर प्रक्रिया केलेल्या गोष्टी खात असाल तर त्या आजच सोडा. त्याऐवजी सुकामेवा आणि ताज्या फळांचे सेवन करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT