आरोग्य

Weight Loss Tips : दिवाळीत फराळावर ताव मारलाय? हे ड्रिंक करेल शरीर डिटॉक्स करायला मदत

सकाळ वृत्तसेवा

आपण अनेक दिवस वाट पाहत असलेली दिवाळी जवळपास संपली आहे. तूम्हीही मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंदात दिवाळी साजरी केली असेल. फेस्टीव्ह सिजनमध्ये आपल्या सर्वांना आपले आवडते पदार्थ खाण्याची संधी मिळते. त्यामुळे या काळात सगळेच डायटींग विसरून खात सुटतात. या काळात मैदा आणि मिठाईचे पदार्थ अधिक खाल्ले जातात. यादरम्यान दारू आणि कोल्ड्रिंक्सचे सेवनही अति प्रमाणात होते.

आईच्या हातचा फराळ, मिठाई या अशा अनेक कॅलरीज वाढवणाऱ्या पदार्थांवर ताव शरीराची वाईट अवस्था झाली असेल. आपण जे काही खातो. ते काही वेळाने कचरा म्हणून शरीरातून बाहेर पडते. त्या कचऱ्याचा काही भाग शरीरात साठत जातो. तो हळूहळू साचतो आणि अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण देतो. त्यामुळे शरीराला थोड्या थोड्या गॅपनंतर डिटॉक्स करण्याची गरज आहे. हे कसे करावे या गोष्टीचे टेन्शन घेण्याची गरज नाही. लिव्हरचे काम सुरळीत व्हावे यासाठी एक खास डिटॉक्स ड्रिंक आहारतज्ज्ञांनी सुचवले आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

हे ड्रिंक बीटापासून तयार केले जाते. बीट लिव्हर एंजाइम ऍक्टीव्ह ठेवते आणि शरीरात पित्त वाढवते. हे लिव्हर शरीर डिटॉक्सिफाई करण्यात मदत करते. ज्यामुळे ते शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे काढून टाकते. दुसरीकडे, लसणात सेलेनियम नावाची जीवनसत्व असते. जे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर असते. या डिटॉक्स ड्रिंकमध्ये लिंबुचाही समावेश आहे. तो तुमच्या लिव्हरला डिटॉक्स करून निरोगी बनवण्याचे काम करते.

कसे बनवावे बीटाचे डिटॉक्स ड्रिंक

डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला बीटरूट, लिंबाचा रस आणि लसूण आणि एक लवंग लागेल. बीट स्वच्छ धुवून त्याचे बारीक काप करावेत. मिक्सरच्या भांड्याच बीटचे काप, लिंबाचा रस, लसणाच्या पाकळ्या आणि लवंग टाकून त्याचा ज्यूस करावा. रोज सकाळी उपाशीपोटी याचे सेवन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT