Weight Loss Tips  Sakal
आरोग्य

Weight Loss Tips चुकीच्या पद्धतीने शरीराचे वजन कमी केल्यास होऊ शकतात हे दुष्परिणाम

चुकीच्या पद्धतीने शरीराचे वजन कमी केल्यास तुमच्या आरोग्याचे भरपूर नुकसान होऊ शकते.

Harshada Shirsekar

Health Tips In Marathi : आपलेही शरीर सुडौल, सडपातळ आणि सुंदर दिसावे; अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी १०० पैकी केवळ २० लोकच मेहनत घेताना दिसतात आणि उर्वरित लोकांचे हे स्वप्न स्वप्नच म्हणून राहते. शरीराचे वाढलेले वजन कमी करणे, हे हल्लीच्या लाइफस्टाइलमधील सामान्य उद्दिष्ट आहे; असे म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही.

शरीराचे वजन नियंत्रणात आणण्यासाठी योग्य पद्धतीने काम केल्यास नक्कीच तुम्हाला निरोगी आरोग्य लाभू शकते. पण काही जण तज्ज्ञांचा सल्ला न घेताच स्वतःच डॉक्टर होऊन वेगवेगळे उपाय करतात, त्यावेळेस याचे गंभीर परिणाम शारीरिक तसंच मानसिक आरोग्यावर पाहायला मिळतात.

चुकीच्या पद्धतीने वेटलॉस करण्याचा प्रयत्न केला तर यामुळे आरोग्यावर कोणकोणते दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…

पित्ताशयात खडे तयार होणे

जेव्हा आहारामध्ये कमी प्रमाणात कॅलरी तसेच फॅट्सयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते, त्यावेळेस पित्ताशयावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. झटपट वजन कमी करण्याच्या नादात पित्ताशयामध्ये खडे तयार होऊ शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य पद्धतीने वेटलॉसच्या जर्नीस सुरुवात करावी. 

मानसिक आरोग्यावर होतात परिणाम

चुकीच्या पद्धतीने शरीराचे वजन कमी केल्यास यामुळे केवळ शरीरावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतात.  डाएट व वर्कआऊटचे रूटीन काटेकोरपणे पाळल्यास म्हणजे क्रॅश डाएट केल्यास चिंता व नैराश्य यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

स्नायू कमकुवत होणे

झटपट वजन कमी झाल्यास शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. शरीराच्या चयापचयाच्या क्षमतेवरही दुष्परिणाम होतात.

पोषणतत्त्वांची कमतरता होते निर्माण ​ 

काही जण वजन कमी करण्याच्या नादात पोष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन करणंच सोडून देतात. यामुळे शरीरामध्ये पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होऊ लागते. जसे की शरीरात व्हिटॅमिन आणि खनिजांचे प्रमाण कमी होऊ लागते.

परिणामी थकवा जाणवणे, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, केस-त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ लागतात, इत्यादी

समस्यांपासून कसा करावा बचाव?

  • वरील समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार डाएट व वर्कआऊट प्लान फॉलो करावा.

  • नियमित व्यायाम करावा. यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राहते.

  • तसंच आहारातही पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा, जेणेकरून शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळेल.

  • किमात सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्यावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT