Weight Loss Tips Sakal
आरोग्य

Visceral fat : पोटाच्या आत जमा झालेले फॅट्स आरोग्यासाठी ठरू शकतात घातक, जाणून घ्या उपाय

आपल्या शरीराच्या आतील अवयवांच्या आसपासची अतिरिक्त चरबी जमा होते, याची अनेकांना माहिती नसावी. पण वेळीच या समस्येवर नियंत्रण न मिळवल्यास आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

Harshada Shirsekar

Weight Loss Tips लठ्ठपणाच्या समस्येमुळे आज कित्येक जण अक्षरशः हैराण झाले आहेत. तास-न्-तास जिममध्ये घाम गाळल्यानंतरही कंबर आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होत नसल्याने लोक अधिक त्रस्त होताहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का? फॅट्स केवळ शरीराच्या बाहेरच नव्हे तर शरीराच्या आतील अवयवांच्या आसपासही जमा होऊ शकतात, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

खूप कमी लोकांना या समस्येबद्दल माहिती असावी की शरीराच्या आतील अवयवांच्या आसपासही अतिरिक्त चरबी जमा होते. ही समस्या वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचं आहे. या समस्येस वैद्यकीय भाषेत व्हिसरल फॅट्स (Visceral fat) असे म्हणतात. याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती…

व्हिसरल फॅट्स म्हणजे नेमके काय? 

व्हिसरल फॅट्स ‘हिडन फॅट्स’ नावानेही ओळखले जाते. व्हिसरल फॅट्स म्हणजे शरीराच्या आतील अवयवांच्या आसपास जमा होणारी अतिरिक्त चरबी. कालांतराने अतिरिक्त चरबी शरीराच्या मध्यभागी जमा होऊ लागते.

विशेषतः हृदय, फुफ्फुसे, आतडे, यकृत आणि शरीराच्या आतील अवयवांजवळ फॅट्स साठू लागते. अशा प्रकारचे फॅट्स सर्वांच्या शरीरात असतात. आपली शरीरयष्टी सडपातळ असली किंवा फ्लॅट अ‍ॅब्स जरी असले तरीही तुमच्या शरीरात हे हिडन फॅट्स जमा होऊ शकते.  

व्हिसरल फॅट्स वाढण्यामागील कारणे

  • व्यायाम न करणे

  • शरीरातील कॅलरी कमी प्रमाणात बर्न होणे

  • अनुवांशिकता 

  • वाढते वय

  • मेनोपॉज

शरीरावर असे होऊ शकतात दुष्परिणाम

  • हृदयसंबंधित समस्या

  • हाय कोलेस्ट्रॉल

  • टाइप 2 मधुमेह

  • अल्झाइमर, इत्यादी

व्हिसरल फॅट्सच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी उपाय

नियमित व्यायाम करा

शरीर सक्रिय नसेल किंवा नियमित व्यायाम न केल्यासही व्हिसरल फॅट्सची समस्या निर्माण होऊ शकताे. सडपातळ असणाऱ्या व्यक्तींनीही नियमित व्यायाम करणे आवश्यक असणे, उदाहरणार्थ वॉक करणे, योगासने, घरातील छोटी-मोठी कामे करणे इत्यादी.    

डाएटची काळजी घेणे

अतिरिक्त व्हिसरल फॅट्स बर्न करण्यासाठी डाएटची विशेष काळजी घेणे आवश्यकता आहे. यासाठी आहारामध्ये फायबरयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा. तसेच प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं टाळावे. तळलेले पदार्थ, शीतपेय, गोड पदार्थांचे मर्यादित स्वरुपात सेवन करावे.  

पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी 

पुरेशा प्रमाणात झोप घेतल्यास शरीरातील अतिरिक्त व्हिसरल फॅट्स कमी होण्यास मदत मिळू शकते. आरोग्य निरोगी राहावे, यासाठी कमीत कमी सात ते आठ तास झोपणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT