Copper Vessel Water sakal
आरोग्य

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक, जाणून घ्या

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने आरोग्यावर नेमका कसा प्रभाव होतो हे आता आपण पाहुयात..

Aishwarya Musale

तुम्ही अनेकांना तांब्याच्या भांड्यात किंवा ग्लासात पाणी पिताना पाहिलं असेल. भारतीय परंपरेत तांब्याची भांडी खूप महत्त्वाची आहेत, शतकानुशतके लोक त्यातून पाणी पीत आहेत, जरी बदलत्या काळानुसार त्याचा ट्रेंडही कमी झाला आणि आज बहुतेक लोक स्टील, प्लास्टिक आणि काचेच्या ग्लासमध्ये पाणी पितात.

तुम्ही देखील अनेकदा ऐकले असेल की तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, आता ही गोष्ट किती खरी आहे हे जाणून घेऊया.

तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यास काय होईल?

तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून ठेवावे आणि नंतर ते पिणे फायदेशीर ठरेल असा सल्ला अनेक आरोग्य तज्ञ देतात. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, तांबे हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते जे शरीराच्या विविध कार्यांमध्ये मदत करते.

हा धातू जीवाणूंचा शत्रू आहे

या धातूमुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. या धातूच्या भांड्यात 48 तासांपेक्षा जास्त काळ पाणी साठवल्यास शरीराला हानी पोहोचवणारे जीवाणू नष्ट होतात.

पचनक्रिया सुधारते

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया सुधारते, याशिवाय त्यात असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. अल्कलाइन वॉटर आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, तांब्याच्या ग्लासातलं पाणी प्यायल्यास शरीराला गारवाही मिळतो.

जेव्हा आपण पचायला कठीण असे कोणतेही अन्न खातो तेव्हा त्यात विषारी पदार्थ आणि उष्णता निर्माण होते. शरीरातून काढून टाकले जातात, अल्कलाइन वॉटर शरीरातील ऍसिड संतुलित करते. विशेषतः उन्हाळ्यात या धातूमध्ये ठेवलेले पाणी प्यावे.

तांब्याच्या भांड्यातील पाणी रिकाम्या पोटी प्या

तसे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कधीही पिऊ शकता, पण जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी तांब्याचे पाणी सेवन केले तर शरीराला जास्तीत जास्त फायदा होईल. लक्षात ठेवा की तांबे हे एक ट्रेस खनिज आहे जे शरीराला अगदी कमी प्रमाणात आवश्यक असते. जर तुम्ही हे पाणी जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरात कॉपर टॉक्सिसिटी वाढू शकते, ज्यामुळे पोटदुखी, जुलाब किंवा उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT