Sun Stroke Symptoms
Sun Stroke Symptoms sakal
आरोग्य

Sun Stroke Symptoms : उष्मघाताची 'ही' लक्षणे वेळीच ओळखा, नाहीतर एक चूक पडू शकते महागात

सकाळ डिजिटल टीम

Sun Stroke : सध्या उन्हाळा सुरू झालाय. सगळीकडे तापमान वाढलंय. उन्हापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण वाट्टेल तरे प्रयत्न करतोय मात्र मागील काही दिवसांपासून उष्मघाताचे अनेक रूग्ण आढळून आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

उष्मघातापासून स्वत:ला वाचविणे खूप गरजेचे झाले आहे. आपली एखादी लहानशी चूक महागात पडू शकते. आज आपण उष्मघाताची काही लक्षणे जाणून घेऊया. ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. (what are the symptoms of sunstroke)

उष्मघाताची लक्षणे

  • थकवा येणे, हे उष्मघाताचं प्रथम लक्षण आहे.

  • ताप येणे

  • डोके दुखणे

  • हातापायांना गोळे येणे

  • चक्कर येणे

  • रक्तदाब वाढणे

  • अस्वस्थता वाढणे

  • बेशुद्ध वाढणे

  • त्वचा कोरडी पडणे

उष्मघातापासून वाचण्यासाठी हे उपाय करा

  • उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

  • उन्हात जास्त वेळ फिरू नये.

  • जास्त तापामानाच्या खोलीत काम करू नये.

  • ग्लुकोज लेवेल मेंटेन ठेवावी.

  • उन्हाळ्यात पातळ, सुती, पांढरे कपडे परिधान करावे.

  • दिवसातून दोन तीनदा थंड पाण्याने अंघोळ करावी.

  • उन्हात काम करताना डोक्यावर टोपी, स्कार्फ, कॅपचा वापर करावा.

  • उन्हातून आल्यानंतर लगेच फ्रिजचे पाणी पिऊ नये. तुम्ही माठातील पाणी पिऊ शकता.

  • लिंबू पाणी, उसाचा रस, ओआरएस, दही किंवा लस्सी, ताक नियमित प्यावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

छत्तीसगडमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खातमा! या सर्वांवर मिळून होतं सुमारे ४८ लाखांचं बक्षीस

T20 World Cup: टीम इंडियाची बार्बाडोसच्या बीचवर दंगा मस्ती; विराट अन् रिंकू तर...; पाहा Video

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात आढळलं ब्लेड! विमान कंपनीनं मान्य केली चूक

SCROLL FOR NEXT