Delta Variant Google file photo
आरोग्य

काय आहे डेल्टा प्लस आणि त्याचा बचाव कसा करायचा? पाहा व्हिडिओ

अक्षय बडवे

पुणे : एका बाजूला भारतात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे या विषाणूचं रुप सतत बदलत आहे. या म्युटेशनला जागतिक आरोग्य संघटनेनं डेल्टा व्हेरियंट असे नाव दिल आहे. आता या व्हेरियंटमध्येही नवीन म्युटेशन झाल्यामुळे त्यालाच आता डेल्टा प्लस म्हणून ओळखले जात आहे. नव्या व्हेरियंटमुळे विषाणूतज्ज्ञ देखील यावर अभ्यास करत आहेत नक्की काय आहे हा डेल्टा प्लस? कोरोना प्रतिबंधक लस या नव्या व्हेरियंटवर प्रभावी ठरणार का? असे सवाल देखील नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. या बाबत महाराष्ट्रातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर दिली आहेत.(What is Delta Plus Variant and how to defend it)

डेल्टा व्हेरियंटमुळं महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली होती. तिसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूची 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी तर जळगावमध्ये 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण सापडल्याचे कळते. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे हजारो नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी मुंबईत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना टोपे म्हणाले, ''राज्याने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाहीला प्रारंभ केला आहे आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या संस्थेचा सहभाग यामध्ये आहे. 15 मे पासून 7500 नमूने घेण्यात आले असून त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 जणं आढळून आले आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा टेस्टी पनीर कचोरी, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT