what is intermittent fasting and its health benefit how it work
what is intermittent fasting and its health benefit how it work sakal
आरोग्य

Intermittent Fasting : इंटरमिटेंट फास्टिंग आणि फायदे...

सकाळ वृत्तसेवा

- विकास सिंह

आपण सर्व ‘टप्प्याटप्प्याने उपवास’ (इंटरमिटेंट फास्टिंग) हा शब्द वारंवार ऐकतो. इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचा प्रयत्न केलेल्या आणि त्याचा चांगला फायदा झाल्याचा अनुभव असलेल्या काही व्यक्तींची भेट झाली.

त्यांचे वजन कमी झाले आहे, ते अधिक सडपातळ दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांना निरोगी वाटत आहे. याचा अर्थ असा, की अशा प्रकारचा उपवास प्रत्यक्षात उतरतो. मात्र, त्याच वेळी ही कायमस्वरूपीची परिणामकारक प्रक्रिया आहे का? उपवासाचे हे तंत्र अवलंबणे खरोखरच योग्य आहे का? त्याचा शरीरावर काही विपरीत परिणाम होतो का? चला जाणून घेऊ या.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

याचा अर्थ सलग तासन् तास जेवण टाळणे. अर्थात, त्यातही भिन्नता आहेत. तुम्ही एखाद्या दिवशी कमी उष्मांक असलेल्या जेवणाचा पर्याय निवडू शकता आणि नंतर संपूर्ण दिवस उपवास करू शकता.

किंवा आठवड्याचे पाच दिवस सामान्य आहार घेऊ शकता आणि उरलेले दोन दिवस उपवास करू शकता. किंवा ८ तासांच्या कालावधीत जेवण घेऊन दररोज उपवास करू शकता. तुमचे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण रात्री आठच्या आधी घेऊ शकता आणि नाश्ता वगळू शकता.

तुम्ही वापरत असलेल्या कॅलरींचे प्रमाण कमी करण्याचा हा चांगला मार्ग असून वजन कमी करण्यात मदत होण्याची शक्यता आहे. परंतु वजन कमी करण्याच्या या पद्धतीमध्ये काही तोटे आहेत ज्याकडे आम्ही तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचा उद्देश आपल्या शरीरापासून कॅलरीज दूर ठेवणे किंवा उष्मांकाचे सेवन कमी करणे हा आहे.

परंतु अन्न म्हणजे फक्त कॅलरीच नसतात त्यात सूक्ष्म पोषक घटकांचाही समावेश आहे. तुम्ही सलग तासनतास अन्न खाणे थांबवता, तेव्हा शरीराच्या संरक्षणासाठीचे आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे कमी पडतात.

याचा विपरीत परिणाम होतो. इंटरमिटेंट फास्टिंग करताना तुमच्या मनाला तुमच्यावर युक्ती खेळण्याची संधी असते. ठराविक वेळेनंतर तुम्ही कोणतेही अन्न खाऊ शकणार नाही हे तुम्हाला आधीच माहीत असल्याने, तुमचे मन त्या वेळेपूर्वी जास्तीत जास्त अन्न सेवन करण्यास प्रवृत्त करेल.

उदाहरणार्थ, तुम्ही रात्री आठच्या आधी जेवायचे ठरवले, त्यावेळी भूक दूर ठेवण्यासाठी दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे उपवासाचा उद्देश निष्फळ होईल. तुम्ही जंकफूडकडे आकर्षिले जाल. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांसाठी हे अधिक आव्हानात्मक असते. कारण जास्त वेळ उपवास केल्याने महिलांमध्ये तणाव निर्माण होतो. ज्याचा थेट संबंध हार्मोनल असंतुलनाशी असतो.

इंटरमिटेंट फास्टिंग करण्याबद्दलची आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे सर्व जेवण खरोखरच कमी वेळात घेत असाल. याचा अर्थ तुमच्या पचनसंस्थेवर थोडा ताण येऊ शकतो कारण एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न खाण्याची सवय नसते.

आणि तुमची उपासमार होत असल्याने, रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते. ‘अधूनमधून उपवास’ करणे परिणामकारक असले तरी प्रत्येकासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही. दीर्घकाळ उपाशी राहण्यापेक्षा, योग्य वेळेत आणि प्रमाणात निरोगी पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर आहे. वजन कमी करण्याचा हा चांगला पर्याय असू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT