Curd Benefits For Health Sakal
आरोग्य

Curd Benefits For Health साखर की मीठ? दही कशासोबत खाणे ठरेल फायदेशीर, जाणून घ्या

दही खायला आवडते का, पण दह्यामध्ये नेमका कोणता पदार्थ मिक्स करून खाल्ल्यास आरोग्यास फायदेशीर किंवा अपायकारक ठरेल? याची सविस्तर माहिती जाणून घेऊया...

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळा ऋतुची सुरुवात होताच लोक आपल्या डाएटमध्ये वेगवेगळे बदल करतात आणि हे बदल करणे गरजेचं देखील आहे. कारण उन्हाळ्यामध्ये संपूर्ण दिवस शरीर हायड्रेट राहणे अतिशय आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात थंड पदार्थ जसे की दही, फळ इत्यादी थंड पदार्थांचे अधिकाधिक सेवन केले पाहिजे, सोबतच जास्तीत जास्त पाणी देखील प्यावे.

दुसरीकडे आपण पाहिले असेल की काही लोक दह्यामध्ये साखर तर काहीजण मीठ मिक्स करून खातात. पण मीठ कि साखर, यामध्ये आरोग्यास सर्वाधिक फायदेशीर काय असते? दह्याचे सेवन करण्याची योग्य वेळ कोणती? हे तुम्हाला माहीत आहे का. दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन या पोषकत्त्वाचे प्रमाण जास्त असते. हे घटक आरोग्यास लाभदायक आहेत. म्हणून आहारात दह्याचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.

दही की मीठ, यापैकी आरोग्यास पोषक काय आहे?

हेल्थ एक्सपर्टनुसार, जर आपण नियमित दह्यामध्ये मीठ मिक्स करून खाल्ले तर कफची समस्या निर्माण होते. तुम्हाला दह्यात मीठ मिक्स करून खाणे आवडत असेल तर आपण एक दिवसाआड अशा पद्धतीने दही खाऊ शकता.

दह्यामध्ये मीठ मिक्स करून खाल्ल्यास मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. पण रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रूग्णांनी मीठ मिक्स करून दह्याचे मुळीच सेवन करू नये.

दही आणि साखर

काही जणांना दह्यात साखर मिक्स करून खाणे अतिशय आवडते. हेल्थ एक्सपर्टच्या मते दह्यामध्ये साखर मिक्स करून खाल्ल्यास शरीराचे वजन जलदगतीने वाढते. मधुमेहाच्या रूग्णांनी दही व साखर एकत्रित खाणे टाळावे. तसंच दही व साखर एकत्रित करून खाल्ल्यास कित्येक शारीरिक समस्या दूर होऊ शकतात.

उदाहरणार्थ पोटात होणारी जळजळ आणि अॅसिडिटीची समस्याही कमी होण्यास मदत मिळते. दह्यामुळे शरीराची पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करते आणि महत्त्वाचे म्हणजे यामुळे शरीर थंड राहते.

दह्याचे सेवन करण्याची योग्य वेळ  

दही खाण्याची योग्य वेळ म्हणजे दुपार. दुपारच्या वेळेस दही खाल्ल्यास पोटाच्या क्रिया सुरळीत सुरू राहतात, असे आहारातज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. रात्रीच्या वेळेस दही खाल्ल्यास शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 

दह्यामध्ये पित्त आणि कफची समस्या वाढण्यास कारणीभूत ठरतील अशा घटकांचा समावेश असतो. त्यामुळे तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत दह्याचे सेवन करावे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT