Agewise Cholesterol levels esakal
आरोग्य

Agewise Cholesterol levels: वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?

तुमच्या वयानुसार कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी ते आज आपण जाणून घेणार आहोत

सकाळ ऑनलाईन टीम

Agewise Cholesterol levels: आरोग्याच्या दृष्टीने कोलेस्ट्रॉल लेव्हल कायम नियंत्रणात असायला हवं. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर आरोग्याला धोका होतो. तेव्हा तुमच्या वयानुसार कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी ते आज आपण जाणून घेणार आहोत.

कोलेस्ट्रॉल हा शरीरात मेणाप्रमाणे दिसणारा पदार्थ आहे. कोलेस्ट्रॉल 2 प्रकारची असतात, एक डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि दुसरं हाई डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL). जर तुमच्या रक्तात LDL चं प्रमाण जास्त झालं तर ब्लड आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिट वाढतं, ज्याला प्लॅक म्हटलं जातं. आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी उत्तम मानलं जातं.

१९ वर्ष वयोगटातील व्यक्तींचं कोलेस्ट्रॉल लेव्हल

मेडिकल रिपोर्टनुसार, १९ वर्षापर्यंत तरूणांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल 170mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. तर non-HDL 120 mg/dl पेक्षा कमी आणि LDL 100 mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. तर HDL 45 mg/dl पेक्षा जास्त असलं पाहिजे.

20 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांचं कोलेस्ट्रॉल लेवल

20 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांच्या शरीराचं टोटल कोलेस्ट्रॉल 125-200 mg/dl च्या मध्ये असलं पाहिजे. तर दुसरीकडे non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी असायला पाहिजे. HDL लेवल 40 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक असणं गरजेचं आहे.

20 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील स्त्रियांचं कोलेस्ट्रॉल लेवल

20 वर्षांपेक्षा जास्त वयातील महिलांच्या शरीरात टोटल कोलेस्ट्रॉल 125–200 mg/dl मध्ये असलं पाहिजे. याशिवाय non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. तर HDL लेवल 50 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक असलं पाहिजे. (Health News)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल लेव्हलचा समतोल राखणं गरजेचं असतं. कारण कोलेस्ट्रॉल लेवल बिघडवी तर हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वापरलेल्या खाद्यतेलापासून बनणार विमानाचं इंधन, भारतात पहिला SAF प्लांट सुरू करण्यास इंडियन ऑइलला परवानगी

Asia Cup 2025: आधी खेळ सुधार! बाबर आझमला कोचची स्पष्ट ताकीद; पाकिस्तान संघातून हाकालपट्टीमागचं खरं कारणही सांगितलं

Ranthambore National Park : वाघांनी भरलेल्या घनदाट जंगलात पर्यटकांना अंधारात सोडून गाईड गेला पळून, ९० मिनिटांत जे घडलं...

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील तीन तास धोक्याचे

Sunil Chhetri: सुनील छेत्रीला सराव शिबिरातून वगळलं; सिंगापूर सामन्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे अजूनही खुले : खालिद जमील

SCROLL FOR NEXT