Jaggery vs Sugar sakal
आरोग्य

Jaggery Vs Sugar : साखर खावी की गुळ?

आपल्या आरोग्यााठी गुळ चांगला आहे की साखर ? जाणून घ्यावी

सकाळ डिजिटल टीम

साखर ही रोजच्या खाण्यातील गोष्ट आहे. चहा, नाश्ता किंवा गोड खाण्यामध्ये साखर ही असतेच. स्वयंपाकघरात साखरेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुर्वी साखरेच्या जागी गुळ हा वापरला जायचा. कालांतराने गुळाची जागा साखरेने घेतली. आज काही ठराविक पदार्थांमध्येच गुळ हा वापरला जातो.

पण आपल्या आरोग्यााठी गुळ चांगला आहे की साखर ? आपण साखर खावी की गुळ? हे आपण जाणून घेणार आहोत. (which one is better Jaggery or Sugar for good health read story

साखर खाणे चांगले की गुळ खाणे चांगले ?

साखरेच्या तुलनेत गुळ पौष्टिक असतो. आयुर्वेदानेही साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ मानला आहे. साखरेत केवळ कॅलरीज असतात आणि याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषकतत्वे साखरेत नसतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते.

त्यामुळे हृदयविकार व डायबेटीसचा धोकाही वाढत असतो. तर गुळामध्ये लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन- B अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात. तसेच शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही. त्यामुळे साखर आणि गुळाची तुलना करता, आरोग्यासाठी गुळचं खाणे हितकारक असते.

डॉक्टर अनेकदा साखर कमी खाण्याचा सल्ला अनेकांना देतात. याऐवजी गूळाचा वापर करायला लावतात. गुळ साखरपेक्षा कसा चांगला हे आपण जाणून घेऊया.

गुळाचे फायदे

  • गूळ हा पचनसंस्थेसाठी उत्तम असतो. यासाठी पचन सुधारतं.

  • गूळ मध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सिलेनियमचे प्रमाण असते जे शरिरासाठी खूप पोषक असतात.

  • याशिवाय गुळात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टर गुळ खाण्याचा सल्ला देतात.

  • गुळ रक्तवाढीस मदत करतं. याशिवाय गुळ दीर्घकाळापर्यंत शरीराला ऊर्जा देते.

  • गूळाचा चहा पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

  • विशेषत: गुळ हा हिवाळ्यात खाणे अधिक चांगले आहे.

साखर खाण्याचे दुष्परिणाम

  • जर तुम्ही दररोज सहा चमच्यापेक्षा जास्त साखर खात असाल ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

  • ज्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुले शरीरातील इंसुलिनचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे शरीराला सूज येणे किंवा त्वचेचे रोग होणे अस्या समस्या जाणवतात.

  • जास्त साखर खाल्यामुळे वजन वाढते. केक, आइस्क्रिम, चॉकलेटमुळे वजन वाढतं. त्यामुळे शक्यतो हे खाणे टाळावे.

  • साखर खाल्याने दाताच्या समस्या वाढतात विशेषत: दात किडूही शकतात.

  • शुगर असलेल्या लोकांनी साखर खाणे टाळावी.

  • अतिप्रमाणात साखर खाल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT